Friday, September 8, 2017

लाखो इथले गुरू...!

बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू!

बघू बंगला या मुंग्यांचा,
सूर ऐकुया या भुंग्यांचा

फुलाफुलांचे रंग दाखवील
फिरते फुलपाखरू...
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!

सुग्रण बांधी उलटा वाडा,
पाण्यावरती चाले घोडा

मासोळीसम बिन पायांचे
बेडकिचे लेकरू...
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!

कसा जोंधळा रानी रुजतो,
उंदीरमामा कोठे निजतो

खबदाडातील खजिना त्याचा
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू

मिळेल तेथून घेउन विद्या
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!


– ग. दि. माडगूळकर

Monday, August 21, 2017

स्त्री का शपथपत्र

मैं मैं हूँ । मैं ही रहूँगी।

मै नहीं राधा बनूंगी,
मेरी प्रेम कहानी में,
किसी और का पति हो,
रुक्मिनी की आँख की
किरकिरी मैं क्यों बनूंगी
मै नहीं राधा बनूँगी।

मै सीता नहीं बनूँगी,
मै अपनी पवित्रता का,
प्रमाणपत्र नहीं दूँगी
आग पे  नहीं चलूंगी
वो क्या मुझे छोड़ देगा
 मै ही उसे छोड़ दूँगी,
 मै सीता नहीं बनूँगी।

मै न मीरा ही बनूंगी,
किसी मूरत के मोह मे,
घर संसार त्याग कर,
साधुओं के संग फिरूं
एक तारा हाथ लेकर,
छोड़ ज़िम्मेदारियाँ
मैं नहीं मीरा बनूंगी।

यशोधरा मैं नहीं बनूंगी
छोड़कर जो चला गया
कर्तव्य सारे त्यागकर
ख़ुद भगवान बन गया,
ज्ञान कितना ही पा गया,
ऐसे पति के लिये
मै पतिव्रता नहीं बनूंगी
यशोधरा मैं नहीं बनूंगी।

उर्मिला भी नहीं बनूँगी
पत्नी के साथ का
जिसे न अहसास हो
पत्नी की पीड़ा का ज़रा भी
जिसे ना आभास हो
छोड़ वर्षों के लिये
भाई संग जो हो लिया
मैं उसे नहीं वरूंगी
उर्मिला मैं नहीं बनूँगी।

मैं गाँधारी नहीं बनूंगी
नेत्रहीन पति की आँखे बनूंगी
अपनी आँखे मूंदलू
अंधेरों को चूमलू
ऐसा अर्थहीन त्याग
मै नहीं करूंगी
मेरी आँखो से वो देखे
ऐसे प्रयत्न करती रहूँगी
मैं गाँधारी नहीं बनूँगी।

मै उसीके संग जियूंगी,
जिसको मन से वरूँगी,
पर उसकी ज़्यादती
मैं नहीं कभी संहूंगी
कर्तव्य सब निर्वाहुंगी
बलिदान के नाम पर
मैं यातना नहीं संहूँगी
मैं मैं हूँ मै ही रहूँ

Saturday, August 19, 2017

फक्त तू खचू नकोस

एक डाव हरला तरी
त्यात काय  एवढं ..?
कुणीतरी जिंकलंच की
हे ही नसे थोड ...
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
       सूर्य रोजच उगवतो,
       त्याच  नव्या तेजाने ...
       रोज मावळतीला जातो
       रोजच्याच् नेमाने ...
       येणे जाणे रितच् इथली,
       हे तू विसरु नकोस ...
       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस...
प्रेम तुझ्यावर करणारे ,
कितीतरी लोक आहेत ...
तुझ्यासाठी जोडणारे ,
खुप सारे हात आहेत ...
अरे अशाच आपल्यांसाठी ,
तू ही थोड हसुन बघ ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
       वाट तुझी बघत असतं,
       रोजच  कुणीतरी ...
       तुझ्यासाठी जगत असतं ,
       आस लावून प्रत्येक क्षणी ...
       त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
       अश्रु तू गाळु नकोस ...
       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस...
उठ आणि उघडून डोळे ,
पहा जरा  जगाकडे ...
प्रत्येकाच्या आयुष्यात ,
काहीतरी असतेच् थोडे ...
नाही नाही म्हणून ,
उगाच कुढत तू बसु नकोस ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
       सामर्थ्य आहे हातात जर,
       स्वप्ने डोळ्यात घेऊन चल ...
       परिस्थितीशी भिडवून छाती,
       दोन हात करत चल ...
       विजय तुझाच असेल
       तेव्हा मागे वळून बघु नकोस ...
       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस...

कृष्णा

कृष्णा,
           तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…
            खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!
            तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?
          तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा 'सखा' झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. 'बाईचा मित्र' ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, 'तो' स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.
         पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला 'नटनागर गिरिधारी' म्हणत साद घातली.
         एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.
         गीतेत 'यदा यदा हि धर्मस्य' म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!
       आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.
        कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!

दुर्गा भागवत

कृष्ण भेटायलाच पाहिजे

कृष्ण भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे. मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला, अन् कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण भेटायलाच पाहिजे मुळात नात्यांच्या पलिकडचे भावबंध जोडणारा.....एक हक्काचा सवंगडी पाहिजे...लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांचीही वयं वाढत असतात त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थ बदलंत असतात तस्संच... ते... पूर्वीचं... निर्व्याज, अबोध नातं पुन्हा जमायला पाहिजे आणि याकरताच आयुष्यात कृष्ण भेटायला पाहिजे...... "तो" कृष्ण "ती" ही असु शकते. आपल्या मनातलं सारं जाणणारी ती असते कधीही आपलं खोलवर मन रीतं करता आलं पाहिजे असा हक्का , विश्वासाचा कृष्ण भेटला पाहिजे........ आपल्या आजुबाजुला तो सापडेलंच असं नाही जोडीदारामध्ये तो गवसेलंच असंही नाही. कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे मात्र कधी मनाचा पेंद्या झाला नाही पाहिजे.... सुंदर विचारांची रम्य मुरली छेडणारा पाहिजे
आयुष्यात प्रत्येकाला कृष्ण भेटला पाहिजे......खरंच त्या मुरलीधराकडे मुरली होती का?की अनेकांच्या मनात रुंजणारी त्याची ती अाश्वस्थ मैत्री होती का? त्याच्या अस्तित्वाने अनेक मनांतून उमटत असाव्या आनंदलहरी अाणि त्यांचीच ऐकु येत असावी रुंजणारी मुरली अनेकांच्या मनामधे मुरणारा तो मुरलीमनोहर प्रत्येकाला भेटायला पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायला पाहिजे......
अंजली मायदेव.

वरुण-वसुचे नाते

 गडगड करूनी, दडदड धावुनी, वरूण राजा येई
आसावली ती वसुंधरा मग, मिठीत अलगद जाई ।

येतो फिरुनी सांगून मजला, गेलास सख्या रे तू
रिझविण्यास मग येऊनी गेले, बाकी सारे ऋतू ।

शरद आला घेऊनी त्याचे,  शुभ्रधवल चांदणे
तयात मी न्हाऊनी निघाले , घालून किती रिंगणे ।

 शिशिर आला घेऊनी संगे, सुखद असा गारठा
शहारले मी, थरथरले मी, चहुकडे हा पर्णसडा ।

कोकीळकूजन, गंधमोहिनी, वसंत ये घेऊनी
त्याच्यासंगे नाचनाचले,  धुंदफुंद होऊनी ।

ग्रीष्माचा तो उष्मा भारी, सृष्टी कोमेजली
मनी माझिया तवभेटीची, आशा अंकूरली ।

ऋतू सारे सवंगडी मज, लोभ असे मजवर
 तुझ्या सरींच्या वर्षावाची, उर्मि मनी नावर ।

भेटीने तव मनी दाटला, गहिवर प्रीतीचा
 होईल आपुले मीलन आला, क्षण हा भाग्याचा ।

पाहुनी ते वरुण-वसुचे, नाते सुंदर प्रेमाचे
सृष्टीलाही वेड लागले, बहरून येण्याचे ।।

                        

राधार्पण

ऐन दुपारी कदंबाखाली
कृष्ण अन त्याच्या सहस्त्र पत्नी
रंग उधळूनी रास रचुनी
गोफ गुंफती हरी भोवती

इतक्यात सर्रकन अवचित रुतला
कमल चरणी हरीच्या ,काटा !!
राधा राधा सत्वर वदला
घननीळ नेत्री अश्रू दिसला !

कोमल रुक्मिणी, सुंदर भामा
जांबुवंती अन वदली कमला
बसता उठता राधा राधा
नसे अर्थ का आमुच्या प्रेमा ?

सोळा शृंगार तुझ्याचसाठी
घास मुखी तव आमुच्या आधी
दारी लाविला पारिजात हा
सहस्त्र शैय्या तुझ्याचसाठी

चिडली भामा, रुसली रखमा
बरे नव्हे हे....राधेला विसरा
कोण गोपी ती ? कुठल्या घरची ?
आम्हा समोरी का तिची  मुजोरी  ?

नकोस फसवू , शपथ तुज सखया,
कलंक न हा भाळी लागो तुझिया
राधेसाठी का व्याकुळ कान्हा
बोल काहीतरी....उत्तर द्याया !!

उठले हरी ... मग दूर जाहले ...
टक लावूनी..  अभ्र पाहिले ...
शांत घटका सरली अन् मग,
मंजुळ वाणी बोलू लागले

वृंदावन जेव्हा टाकिलें,
अन् सोडिले राधेला,
पुन्हा न होणे भेट कदापि
माहित झाले भाबडीला.

माग म्हणालो आज काहीही,
माझी आठवण..प्रतिक प्रीतीचे...
बोलली राधिका झुकवून डोळे,
कधी न मागिले आज मागते..

मूर्ती तव मम  मनी सर्वदा,
परी  विनवणी करते तुजला
सल जरी इवला, अंगी रुतला
डंख तयाचा व्हावा मजला !

कमलदल-सम चरणांना तुझिया
पायघड्या मम ह्रदयीच्या व्हाव्या
चाललास जरी दोन पावले,
क्षेम कुशल तव मज धाडाव्या

म्हणून सखये ओठी राधा
दोन  तन, मन एकच गाभा
पाऊल जरी मी एक ठेवले
ती भू नाही ..काळीज स्मरते !!

म्हणून सांगतो.. प्रिय पत्नींनो,
राधा लौकिक अर्थाने मैत्रिण
अर्धांगिनी जरी हरीच्या तुम्ही,
राधा मात्र......माझे 'मी-पण'...

राधे इतकी प्रीती मजवर
आहे कुणी का केली सांगा ?
म्हणून सांगतो निजभक्तांना
कृष्णा आधी बोला राधा...

प्रीतीचे ते सुंदर मंदिर
कशी करावी दूर आठवण?
राधा भरली कणा कणातून
कृष्ण राहिला फक्त राधार्पण.!!

शब्द

शब्द उभा करता
आला पाहिजे,
मनामनात ... गुढीसारखा

शब्द झेलता
आला पाहिजे,
शंकराने झेललेल्या ... गंगेसारखा

शब्द गिळता
आला पाहिजे,
निळकंठाने प्राशलेल्या ... विषासारखा

शब्द पेलता
आला पाहिजे,
रामाने पेललेल्या ... धनुष्यासारखा

शब्द मोजता
आला पाहिजे,
उर्मिलेच्या ... क्षणांसारखा

शब्द पुजता
आला पाहिजे,
हनुमानाच्या ... भक्तीसारखा

शब्द चाखता
आला पाहिजे,
शबरीने चाखलेल्या ... बोरासारखा

शब्द जोडता
आला पाहिजे,
लंकेच्या ... सेतूसारखा

शब्द भोगता
आला पाहिजे,
अश्वत्थाम्याच्या ... जखमेसारखा

शब्द मागता
आला पाहिजे,
दुर्योधनाच्या ... हट्टासारखा

शब्द तोलता
आला पाहिजे,
बळीराजाने ... तोलल्यासारखा

शब्द कोरता
आला पाहिजे,
अजंठाच्या ... मुर्तीसारखा

शब्द फेकता
आला पाहिजे,
पुंडलिकाच्या ... विटेसारखा

शब्द बोलवता
आला पाहिजे,
ज्ञानेश्वराच्या ... रेड्यासारखा

शब्द फडकवता
आला पाहिजे,
शिवबाच्या भगव्या ... झेंड्यासारखा

शब्द जपता
आला पाहिजे,
वहीतल्या ... पिंपळपानासारखा

Thursday, August 17, 2017

'तिचे शूज'


तिचा हात हातात घेऊन चालता चालता तो म्हणाला, "मला एकदा तुझे शूज घालून चालायचंय...."

"नको रे, सोपं नाही ते....! तू तुझे कष्ट झेलतोच आहेस ना, आपला प्रवास सुखात चालला आहे ना" ती म्हणाली.

त्याचा हट्ट म्हणून तिने 'तिचे शूज' त्याला दिले. तिच्या शूज मधला त्याचा प्रवास सुरू झाला.

हिरवळीवर चालता चालता अचानक खडे टोचू लागले.
करियरसाठीचा विरोध, नोकरीची वणवण, लग्न ठरल्यावरची द्विधा अवस्था,माहेर सुटल्याचं दुःख, आयुष्याचा संघर्ष पायाला जाणवू लागला.
गरोदरपणातील अस्वस्थता,बाळंतपण,अन् नंतर तो गोंडस स्पर्श.... रात्रीची जागरण,नोकरीतली ओढाताण, तरीही तिने नेहमी त्याच्यासाठी सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न, त्याच्यासाठी वेळ काढायची धडपड,कधी टोमणे कधी कौतुक, जबाबदाऱ्यांचे ओझे जाणवत होतं थोडं थोडं....

केवळ तिचे शूज घालूनसुद्धा काही अव्यक्त सलदेखील आता टोचत होते पायाला.... कधी चटकेदेखील बसले....त्याने झटकन शूज काढले म्हणाला, "कसं चाललीस एवढं...!"
ती हसली; म्हणाली, "तुझ्यासाठी.... माझ्यासाठी.... आपल्यासाठी...!!!

some good thoughts

संयम म्हणजे काय?
 एक युद्ध.......
 स्वतः च्या विरूद्ध...!

संवाद संपला की नातं थांबतं... म्हणून बोलून बघा कदाचित तुमच हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल
 
          जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात..... शब्द प्रेम देतात,शब्द प्रेरणा देतात. शब्द यश देतात,शब्द नातं देतात. शब्द आयुष्यभर आणि आयुष्या नंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल  होतं.

तरीही माझं जीवन सुखाचं होतं

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होते
आजोबांपासून नातवापर्यंत भरलेलं होतं,
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं
घरादाराला कधीही ’लॉक'  नव्हतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

आजोबांचंं स्थान घरात सर्वोच्च होतं
स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होतं,
पाहुण्यांचं येणं-जाणं नित्याचंच होतं
आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

घरासमोर छोटंसं अंगण होतं
तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं,
दारात रांगोळी काढणं अनिवार्य होतं
विहिरीवरून पाणी भरणं कष्टाचं होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा,
माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा-
दगडानं अंग घासणं फ़ारसं सुसह्य नव्हतं
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

पायात चप्पल असणं सक्तीचं नव्हतं
अंडरपँट बनियनवर फ़िरणं जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं
मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहन नव्हतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

शाळेत गुरुजनांप्रती आदर होता
घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता
छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता,
नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता
कलांना "भिकेचे डोहाळे" असंच नाव होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा
पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,
शाळेचा युनिफॉर्म थोरल्याकडूनच मिळायचा
तिन्हीसांजेला घरी परतणं सक्तीचं होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या
पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर गाव भरलेला असायचा -
उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्य राज्य होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे
घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे
नॉनवेज खाणं हे तर माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

शाळेत अभ्यासाला खूप महत्व होतं
नंबरावर बक्षीस/छड्या यांचं प्रमाण ठरत होतं,
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हतं
वशिल्यानं पास होणं माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

गावची जत्रा  हीच एक करमणूक असायची
चक्र-पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची
विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

गावाबाहेरचं जग हिरवंगार असायचं
सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचं,
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं,
प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा
क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या
डे-नाईट, ट्वेंटी- २० चं नावही नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

प्रवास झालाच तर एस्टीनेच व्हायचा
गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
हॅन्डल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा
लक्झरी, फर्स्टक्लास एसीचं नावही नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी होती
चमनचिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती
लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची
बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीओ सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची
ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा
दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणाऱ्याच्या पाठीत रट्टा बसायचा
हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

मामाच्या गावाला कधी जाणं-येणं होतं
दंगामस्ती करायला नैशनल परमिट होतं,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं
भाऊबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे
बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचं
प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

पाव्हणे रावळे इ.चा घरात राबता असायचा
सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यांनाही पंक्तीत सन्मान असायचा
पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं

आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लॅट आहे
मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दणदणाट आहे
फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे

आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत
दूध, बूस्ट, काॅम्प्लानचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कॅल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे
कपडे, युनिफॉर्म क्रीडा साहित्य हवे तितके आहे,
बालकांच्या नशिबी मात्र  पाळणाघर आहे

आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे
सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा ऐक्टीविटीजना घरात सन्मान आहे
छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
आजीआजोबाना वृद्धाश्रमाचा रस्ता मोकळा आहे

आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे
मागेल ती वस्तू क्षणात हजर होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे
सध्या बाय वन गेट वनचा जमाना आहे..
म्हणून पैशांवर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे..

व. पु. 

Tuesday, July 18, 2017

माझी मुलगी

छे ती कुठे माझी मुलगी
ती तर आहे श्वास माझा
उद्या मनांवर राज्य करेल
स्वप्नं नाही विश्वास माझा...

वडील होण्या इतपत जगात
कोणताच प्रचंड आनंद नाही
नि कन्या झाली तर कोणतचं सुख
त्याहून बेधुंद नाही...
.
मुठ आवळून तू बोट धरतेस
तो हरेक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो...
.
माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं
किंचाळणं जरी मधूर आहे
माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं
हे समाधान भरपूर आहे...
.
असावं लागतं पुण्यवान,
नि त्याही पेक्षा खूप भाग्यवान
ज्या पित्याचे हात उरकती
सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान...
.
मुला-मुलीत भेदभावाचा
तो प्रश्नच मी उगारत नाही
वडीलांचं मुलीवर प्रेम जास्त
हे सत्यही मी झुगारत नाही...
.
संसारात रमण्या पेक्षा मी
मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो
भावनांच्या खेळात आई नंतर
मुलीचाच तर क्रम येतो...
.
बाबा म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
समाधानाची इवली इवली फुलं
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात...
.
तू सुखी राहावीस
देवाकडे एवढचं मागणं आहे
म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी
दिवसरात्र झिजणं, जागणं आहे...
.
आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे...
.
भाग्य ज्याला म्हणतात ते
माझ्या मुलीतच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडलं आहे...
.
मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणं
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते...
.
आभाळा एवढं सुख काय ते
मुलगी झाल्यावर कळतं
एक वेगळच आपलेपण
तिचं प्रत्येक हास्य उधळतं...
.
इतरांचे नशीब घेऊन येतात
त्या बाबतीत मुली माहीर आहेत
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसं जग जाहीर आहे...
.
मुलींचे एक छान असतं
मुलगी असण्याचा अभिमान असतो
त्यांचा अभिमान वडीलांसाठी
मान, शान व सन्मान असतो...
.
छे ती कुठे माझी मुलगी
ती तर आहे श्वास माझा
उद्या मनांवर राज्य करेल
स्वप्नं नाही विश्वास माझा...
कसे आहात ?
मजेत !
तुम्ही ?
मी पण मजेत !

अरे वा काय कमाल आहे ?
मी मजेत
तुम्ही मजेत
मग दुःखी कोण आहे ?

दुःखी ?
कुठंय कोण दुःखी ?
या एका प्रश्नावर
सारी जनता मुकी !

दुःख कुणी सांगत नाही
हेच मोठं दुःख
सुखी मात्र कुणीच नाही
एवढं मात्र पक्क !

दुःखाला वाटते
हसण्याची भीती
रोज सोबत राहून सुद्धा
माणसं राहतात रीती !

एकमेकाचा रितेपणा
घालवावाच लागेल
तरच माणूस चार दिवस
मजे मध्ये जगेल  !

बोलत बोलत हासलं की
डोळ्यात येतं पाणी
मग बघा दुःखाचीही
होतात गोड गाणी

कुणाच्याही दुःखाची
करू नका टिंगल
दुसऱ्याला हासल्यावर
कसे होईल मंगल ?

आपल्या बद्दल इतरांना
विश्वास वाटला पाहिजे
" आतलं दुःख सांगताना "
आधार वाटला पाहिजे

काळजाच्या कपारीतली
सल सांगत जावी
वेदना कमी करण्यासाठी
फुंकर घालत जावी

मग बघा माणसं कशी
आपसूक जवळ येतात
एकमेकाच्या दुःखाला
अलगद कवेत घेतात

इथे मजेत राहण्याचा
एकच उपाय आहे
मन मोकळं करण्यासाठी
माणूस हवा आहे !
बघ तुला जमतं का ..

तू देवासाठी उपवास कर किंवा नको करूस
मर्जी तुझी ....
जीभेवर ताबा नाही जमला तरी चालेल
पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय


तू देवळात रोज जा किंवा नको जाऊस
इच्छा तुझी ..
तीथे वाकला नाहीस तरी चालेल
पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात


तू सोवळं ओवळं मान किंवा नको मानूस
हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल
पण  तुझे आचार मात्र ठेव पवित्र

तू पोथ्या - पुस्तकं वाच किंवा नको वाचूस
निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल
पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच

नाती

सुख ओरबडण्याच्या शर्यतीत
सामील होऊ नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा

प्रेम , त्याग , सहनशीलता
ठेवावीच लागेल
आपल्या माणसाशी नातं तोडून
कसं काय भागेल ?

कौतुक करणारं असेल तर
मोठं होण्याला अर्थ असतो
लाखोंचं इंटेरियर करून सुद्धा
माणूस का उदास दिसतो ?

सुबत्तेच्या विळख्या मधे
खरंच सापडू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा

जगाशी मैत्री करतांना
मूळं  का उपटावीत
दूरचे जवळ घेतांना
सख्खे दूर का लोटावीत ?

पाणी आणि मृगजळ यातला
फरक लक्षात घ्या
नातं तोडणाऱ्या अहंकाराला
तिलांजली द्या

इतरांच्या सुखदुःखात
सामील व्हावच लागेल
तरंच  सोनेरी महाला मध्ये
तुमचं मन लागेल

मृत्यू जवळ दिसल्या नंतर
उपयोग काय ' नाती ' आठवून ?
जन्मभर का जगायचं
प्रेम आणि अश्रू गोठवून

आयुष्य फार छोटं आहे
दिवस भुर्रकन उडून जातील
Whats app , Face book वरून
फक्त " R I P " चे मॅसेज येतील

रक्ताच्याच नात्या मधील
काही डोळ्यात पाणी असेल
तुमच्या लेकरां-बाळा जवळ
काका , आत्या , मावशीच असेल

मतभेद जरी असतील काही
बसून , बोलून संपऊन टाका
ताठरपणा सोडून देऊन
बहीण , भावाला मारा " हाका "

Week end ला मॉल मध्ये
Aim less भटकू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा

मनाचं रंजन करण्यासाठी
माणूसच लागत असतो
संपत्ती कितीही असली तरी
" गप्पाची भीक " मागत असतो

नशिबाने मिळालेली
प्रेमळ नाती तोडू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा .
पावसाचं आणि धरणीचं, झालं एकदा ब्रेकअप..
रुसली धरणी, बिघडून गेला तिचा मेकअप..!

कधीच नाही भेटणार तुला,
पाऊस गेला सांगून..
धरणी म्हणाली मग त्याला,
मुकाट येशील मागून..!

रागाने पाऊस आपले, घेऊन गेला ढग..
जिरवूया आता म्हणे, धरणीची रग..!

हिरमुसली धरणी
अन सुकून गेल्या वेली..
सौंदर्याची तिची मग, रयाच गेली..!

तिला असे पाहून,
पावसा आले भरून..
काय उपयोग असतो, उगाच भांडण करून..!

मनातल्या मनात,
धरणी होती झुरत..
पावसा ये ना धावत,
मनी याचना होती करत..!

न राहावून पावसाने,
ढग केले गोळा..
चित्त नव्हते थाऱ्यावर,
भाव त्याचा भोळा..!

वाऱ्यासार होऊन स्वार,
तो आला प्रियेसाठी..
बिलगता धरणीची, गंधाळली माती..!

ओल्या त्याच्या स्पर्शाने, तिचे शहारले अंग..
अन पुन्हा मिळाला धरणीला,
तिचा हिरवा रंग..!

धरणी म्हणाली पावसाला,
पुन्हा कधीच नको भांडू..
विरहात सख्या माझे,
अश्रू नको सांडू..!
*जग कसं अजब आहे !*

देवावर प्रेम सर्वांनाच आहे.
...पण 'त्याच्या घरी' जायची
घाई मात्र कुणालाच नाही.

आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.
...पण त्याच्या घरी आपण जायच्या
विचाराने मात्र मनात धडकी भरते.

देव आपल्या घरी आला म्हणजे,
'सण, उत्सव आणि आनंद.'
आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे,
'दुःख, शोक.'

देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा.
आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा.

देवाघरून येणं म्हणजे 'जन्म'.
देवाघरी जाणं म्हणजे 'मृत्यु'.

दोन्ही अटळ आहे.
पण ह्यामधली जी गंमत आहे,
त्यालाच 'आयुष्य' म्हणतात.

                               _- व. पु. काळे_
Dedicated to P L Deshpande lovers..

१७ वर्ष झाली, भाई, तुम्हाला जाऊन.... तरी अजून रोज भेटता.... कधी वर्तमानपत्रातून, कधी पुस्तकातून, कधी ऑडिओ कॅसेट्च्या रूपात, कधी गाण्यात, कधी हार्मोनियमच्या स्वरात,  कधी जाहिरातीतल्या कोट्यांमधून....

अजूनही कधी एसटीच्या प्रवासात म्हैस आडवी जाते, तेव्हा तुम्ही भेटता.

डिजिटायझेशनच्या ह्या बदलत्या काळात रस्त्यानी एखादं साईन-बोर्ड पेंटिंगचं दुकान दिसलं की, तुमची आठवण येते.

पोस्ट खाती आता फक्त नावालाच उरली आहेत. पण, तुम्ही कथांमध्ये रंगवलेली पोस्ट ऑफिसं अजूनही जिवंत आहेत.

गल्लोगल्ली अध्यात्माची दुकानं लागलेली पाहून आजही तुमचं, 'असा मी, असा मी' आठवतं आणि हसू येतं.

"मला सगळ्याच राजकारण्यांचं म्हणणं पटतं" हे अजूनही कित्येकांच्या बाबतीत घडताना दिसतं... अगदी माझ्याही.

आजूबाजूला पसरत चाललेली अराजकता आणि अस्वच्छता पाहून "इंग्रज गेला तो कंटाळून... शिल्लकच काय होतं, इथं लुटण्यासारखं ?" हे नेहमी आठवतं.

एखाद्या टपरीवर चहा घेत असताना नकळत आधी चहाचा रंग पाहिला जातो आणि 'अंतू बर्वा'चा चहाच्या रंगावर मारलेला शेरा आठवतो.

भारत सरकार कडून मिळणारा द्रोणाचार्य पुरस्कार 'चितळे मास्तरां'ना मिळायला हवा, अशी एक भाबडी आशा मनात घर करून आहे.

नवीन घर बांधणारे लोक आजही हातात विटा घेऊन समोर उभे राहताहेत.

एखादी मुलगी कुत्र्याशी लडिवाळपणे बोलत उभी असेल तर 'पाळीव प्राण्यां'चा संपूर्ण अल्बम डोळ्यापुढून झर्रकन निघून जातो.

लग्नाच्या पद्धती बदलल्या, सर्व सोयी उपलब्ध झाल्या, मोबाईलच्या एका क्लीक वर सुपारी पासून भटजींपर्यंत सर्व गोष्टी मिळत असल्या, तरी प्रत्येक मांडवात नारायणाची उपस्थिती असतेच ! त्याला अजून रिप्लेसमेंट मिळालेली नाही.

चाळी जाऊन सोसायट्या आल्या पण गच्चीचा प्रश्न अजूनही तसाच आहे.

जुन्या आणि मोजक्याच शिल्लक असलेल्या काही इराणी हॉटेलांमधून आजही असंख्य 'नाथा' कामात एकटेच झुरत आहेत आणि त्यांच्या वाक्याची सुरवात अजूनही "बाबा, रे" नेच होत आहे.

आजच्या ह्या कॉम्पिटिशन च्या जमान्यात काही 'रावसाहेब'ही आहेत. टिकून नाही, असं नाही... पण, तुमच्यासारखे कलावंत त्यांच्या वाट्याला येत नाहीत. हे जग चालवण्यासाठी अजूनही कोणाला काही करावं लागत नाही.

तुम्ही अनुभव दिलेल्या प्रत्येक गोष्टी आज अस्तित्वात आहेत. पण, तुम्ही नाहीत.

तुमच्या आठवणी, तुमचे किस्से, तुमच्या कथा, तुमची नाटकं, तुमची गाणी, तुमचं संगीत आजही अजरामर आहे... तुकारामाच्या गाथेसारखं...

भाई, तुमच्याशी इमोशनल अटॅचमेंट असणारी बहुधा आमची ही शेवटची पिढी...!

मागे एकदा एका मित्राकडे गेलो असताना त्याने त्याच्या पुस्तकांचं कपाट माझ्यापुढे उघडलं. कपाट कसलं, खजिनाच तो. विविध विषयांची, विविध लेखकांची असंख्य पुस्तकं त्यात आपलं अस्तित्व पणाला लावून उभी होती. पण, त्यातही तुमची पुस्तकं मला चट्कन ओळखता आली... कारण, तुमच्याच भाषेत सांगायचं तर "कोणत्याच पुस्तकाची पानं एवढी चुरगाळलेली नव्हती !"

(लेखक : अज्ञात)
अरण्यातही त्या सीतेला रामांचा सहवास,
घरात राहुन सौभाग्याविण उर्मिलेस वनवास!

सप्तपदी दोघीही चालल्या,कोठे झाली चूक,
तृप्ती एका नशिबी लिहिली दुसऱ्या नशिबी भूक!

लक्ष मनाने लक्ष्मणास ती एकटीच स्मरते,
स्मरण नव्हे ते मरण वाटते प्रतिक्षणी झुरते!

कुंकू आणखी हळदीमध्ये अंतर वर्षे चौदा!
का नियतीचा तिच्यासाठी हा क्रूर असा सौदा!

सीतेप्रमाणे नाही नशिबी आदर्शाची कथा!
अंधाराला कशी दिसावी अडगळीतली व्यथा!

जगास माहित कांचनमृग तो आणि अग्नीदिव्य!
वाल्मिकी नाही वाचू शकले माझे भवितव्य!

लक्ष्मण झाले मुर्छित कळले चौदा वर्षानी!
चौंदा वर्षे आंधळ्यापरी बघते स्पर्शानी !

वनवासातील सर्व श्वापदे जखमी करती इथे!
लक्ष्मण रेषा माझीसुद्धा दिसली कोणा तिथे?

ओलांडून मी गेले नाही चौदा वर्षे वेस!
वाऱ्यावरती नाही उडाला विंचरताना केस!

चौदा वर्षे रावण झाली जगले मी हालात!
नाथाविण मी अनाथ होते, इथे महालात!

रामायण माहीत जगाला ,नाही उर्मिलायण!
वनवासाहून महालात या मी फिरले वणवण!

प्रमोद जोशी. देवगड 9423513604
प्राजक्त

काल एक सुंदर चारोळी वाचली....

'सकाळी अंगणातला पारिजात,
फुलांचा सडा टाकून मोकळा होतो
रिते होण्यातले समृद्धपण,
तो किती सहजपणाने दाखवतो'

कुणाची आहे माहित नाही. पण भावली मनाला. आणि

'प्राजक्त सडा टाकून मोकळा झाला'.

 त्याचा भार हलका झाला. अर्थात....फुलंच ती....इलुशी...नाजुक....त्यांचा भार तो कितीसा असणार ! आणि काहीही झालं तरी 'सृजनाचा' कुठे कधी भार होत असतो का ? 'हलका झाला'... पण म्हणून पोकळी नाही निर्माण झाली. 'मोकळा' झाला पण रिता झाला असेल का खरंच ? मला नाही तसं वाटत ! 'रित' होण्यासाठी 'रिकामं' असावं लागतं मुळात. प्राजक्ताकडे हे रिकामपण नक्कीच नाही. . तो केव्हाच पुन्हा सृजनाच्या त्या सुंदर प्रक्रियेत मशगुल झाला. उद्यासाठी तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय....फुलांना फुलवायचंय....प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवायचीये ...शिवाय देठादेठात केशर !

मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला...तो काही माणूस नाही नं.

जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून सुटतात, तत्क्षणी तो त्या फुलांवरचे, सारे हक्कही सोडतो...आजची फुललेली सारी फुलं, वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून तो मोकळा होतो. गुंतून नाही पडत तो त्या फुलांमध्ये. म्हणून विरहाच दुःख त्याला ठाऊक नाही.आणि म्हणूनच रितेपणाची भावना मुळ धरत नाही.तो अनुभवतो ..ती फक्त बहरण्यातली परिपूर्णता आणि 'देण्या'तलं समाधान.

आपल्यालाही, आयुष्य असंच जगता आलं तर ? तो तो क्षण, वर्तमानाला अर्पण करून टाकायचा. आणि मोकळं व्हायचं त्या क्षणातून ! गुंतून नाही रहायचं त्यात. पुढचा नवा क्षण खुलवायला...फुलवायला... नव्याने सज्ज व्हायचं. फक्त आपलंच नाही तर इतरांचही आयुष्य सुगंधी करायचं.

जमेल का, असं 'प्राजक्त' व्हायला ?

..

Friday, June 23, 2017

सारं काही स्वतःसाठी

देवधर्म पूजाअर्चा
सारं असतं स्वतःसाठी
देवाला यातलं काही
नको असतं स्वतःसाठी

फुलं अर्पण करतो देवाला
ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून ?
सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा
त्याला काय करायचंय फुलं घेऊन ?

नैवेद्य जो आपण दाखवतो
तो काय देव खातो ?
तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं
भरणपोषण करीत असतो !

निरांजनाच्या इवल्या ज्योतीने
ओवाळतो आपण प्रभूला
चंद्रसूर्य जातीने
हजर ज्याच्या दिमतीला

स्तोत्रं त्याची गातो ती काय
हपापलाय म्हणून स्तुतीला ?
निर्गुण निराकार जो
त्याला अवडंबर हवंय कशाला ?

सारं काही जे करायचं
ते स्वतःसाठीच असतं करायचं ,
प्रार्थनेनं देव बदलत नसतो
स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं !
आवडलेल्या आमटीचा
आवाज करीत मारता भुरका
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही !

जबरदस्त डुलकी येते
धर्मग्रंथ वाचता वाचता !
लहान बाळासारखे तुम्ही
खुर्चीतच पेंगू लागता !
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकारणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही !

देवळापुढील रांग टाळून
तुम्ही वेगळी वाट धरता !
गरम कांदाभजी खाऊन
पोटोबाची पूजा करता !
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकारणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही !

प्रेमाची हाक येते
तुम्ही धुंद साद देता !
कवितेच्या ओळी ऐकून
मनापासून दाद देता !
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकारणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही

-- मंगेश पाडगावकर--
::स्त्री का शपथपत्र::

मैं मैं हूँ । मैं ही रहूँगी।

मै नहीं राधा बनूंगी,
मेरी प्रेम कहानी में,
किसी और का पति हो,
रुक्मिनी की आँख की
किरकिरी मैं क्यों बनूंगी
मै नहीं राधा बनूँगी।

मै सीता नहीं बनूँगी,
मै अपनी पवित्रता का,
प्रमाणपत्र नहीं दूँगी
आग पे  नहीं चलूंगी
वो क्या मुझे छोड़ देगा
 मै ही उसे छोड़ दूँगी,
 मै सीता नहीं बनूँगी।

मै न मीरा ही बनूंगी,
किसी मूरत के मोह मे,
घर संसार त्याग कर,
साधुओं के संग फिरूं
एक तारा हाथ लेकर,
छोड़ ज़िम्मेदारियाँ
मैं नहीं मीरा बनूंगी।

यशोधरा मैं नहीं बनूंगी
छोड़कर जो चला गया
कर्तव्य सारे त्यागकर
ख़ुद भगवान बन गया,
ज्ञान कितना ही पा गया,
ऐसे पति के लिये
मै पतिव्रता नहीं बनूंगी
यशोधरा मैं नहीं बनूंगी।

उर्मिला भी नहीं बनूँगी
पत्नी के साथ का
जिसे न अहसास हो
पत्नी की पीड़ा का ज़रा भी
जिसे ना आभास हो
छोड़ वर्षों के लिये
भाई संग जो हो लिया
मैं उसे नहीं वरूंगी
उर्मिला मैं नहीं बनूँगी।

मैं गाँधारी नहीं बनूंगी
नेत्रहीन पति की आँखे बनूंगी
अपनी आँखे मूंदलू
अंधेरों को चूमलू
ऐसा अर्थहीन त्याग
मै नहीं करूंगी
मेरी आँखो से वो देखे
ऐसे प्रयत्न करती रहूँगी
मैं गाँधारी नहीं बनूँगी।

मै उसीके संग जियूंगी,
जिसको मन से वरूँगी,
पर उसकी ज़्यादती
मैं नहीं कभी संहूंगी
कर्तव्य सब निर्वाहुंगी
बलिदान के नाम पर
मैं यातना नहीं संहूँगी
मैं मैं हूँ मै ही रहूँ
पाऊस पडून गेला की
आकाशात सुंदर इंद्रधनुष्य उमलतं ;
त्याला पाहून मातीनं रुसावं का ?
सगळे रंग आकाशात तसेच ठेवून आलास,
मला काय दिलंस   म्हणून भांडावं का ?
***
नाहीच भांडत ती ,
मान्य करून टाकते की ,
त्याचं रंगहीन होऊन आपल्याकडे येणं ,
उगीच मनाला लावून घ्यायचं नाही ,
त्या कोरडय़ा सुंदर रंगापेक्षा आपल्याला काय मिळालं हे पहायचं    !
***
तो भरभरून बरसतो, तेव्हा रंगहीन असतो हे खरं ;
पण तो तिला जगण्याची,उमलण्याची ,
स्वत:तून रंग फुलवण्याची जादू देतो.
त्या जादूनं ,
काळ्या मातीतून किती रंग उमलतात ,
आणि रंगच कशाला ,
किती गंध , किती आकार,
किती प्रकारचं जगणंही बहरतं !
क्षणभर उजळणा:या रंगापेक्षा
स्वत: अनेक रंगांत उमलण्याची जादू
म्हणून तर काळ्या मातीला
किती युगं झाली, तरी हवीच असते त्याच्याकडून .
***
जगण्याचा तोल हा असा असतो !
कुणाला क्षणभराचे रंग मिळतात ,
कुणाला सुंदर क्षण मिळतात ,
कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहतं ,
तर कुणाला मिळतं फक्त जगण्याचं बीज .
त्यातून आपापलं फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते .
एकदा ती जादू आली की ,
रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत,
ते उमलत राहतात,
बहरत राहतात.
***

( एका स्पॅनिश कवितेचा मुक्त अनुवाद)

Tuesday, April 11, 2017

ओव्हरड्राफ्ट

         रोजच्यासारखी बिनगजराची पाच वाजता जाग आल्याने  'दातार मास्तर' अंथरुणात उठून बसले.
यंत्रासारखे हाताचे तळवे चेहऱ्यापुढे आले आणि ते _कराग्रे वसते लक्ष्मी…._ म्हणायला लागले.काय करायचंय एवढ्या लवकर उठून...? असं रोजच्यासारखं म्हणत ते चटकन उठले. पांघरुणाची घडी, चादर इस्त्री केल्यासारखी नीटनेटकी करून उशाशी असलेल्या तांब्यातलं उरलेलं पाणी त्यांनी पिऊन टाकलं आणि ते आवरायला लागले.
        सत्तरी ओलांडलेले मास्तर अजून वेतासारखे सरळ होते. सहा फुटांची सणसणीत उंची, रापलेला गोरा वर्ण, भेद घेणारे पिंगट डोळे, डोक्यावर पांढऱ्या केसांची झालर आणि खर्जातला आवाज म्हणजे दातार मास्तर.
आजचा दिवस त्यांच्यासाठी विशेष होता. ह्या दिवसाला ते स्मरणयात्रा म्हणायचे. आनंदीला - त्यांची बायको - जाऊन आज दहा वर्ष झाली. मास्तर मोत्यासारख्या अक्षरात रोजनिशी लिहायचे. आज सगळ्या रोजनिश्या काढून ते बसायचे. काही ठिकाणी त्यांनी खुणेचे कागद ठेवले होते. तेवढंच ते आज वाचायचे. चटचट आवरून त्यांनी दुधाचा फक्कड चहा केला आणि कप घेऊन ते आरामखुर्चीत येउन बसले.
         कोकणातली सकाळ सुखासारखी असते, कमी काळ टिकणारी. एकदा सुर्य वर आला की घामाच्या धारा चालू. पण मास्तरांचं घर पूर्व पश्चिम दरवाज्याचं होतं त्यामुळे अनपेक्षित थंडगार झुळूक कधीही सुखवून जायची.            मास्तरांना फक्तं चहा करता यायचा, बाकी सगळी बोंब होती. त्यामुळे भूक लागली असं वाटलं तर ते चहा प्यायचे आणि परत खुर्चीत बसायचे. आत्ताही अंगणात कोवळ्या उन्हात बागडणा-या चिमण्या बघून त्यांना आनंदी आठवली. आपण गेलो की लगेच सगळ्या गायब होतात, आनंदी कडेनी गेली तर त्या निर्धास्त बसायच्या आणि तेंव्हा संख्येनेही जमायच्या. आज रोजनिश्या काढायचा त्यांना कंटाळा आल्यासारखं झालं. कुठे काय विसरलोय आपण! सगळं कसं कालपरवा घडल्यासारखं लख्खं आठवतंय.
         "मागच्या जन्मीचं पुण्यं रग्गड असणार माझं म्हणून तू मला मिळालीस.."_  असं म्हणालेे ते एकदा आनंदीला, ती म्हणाली, _" खरंय, माझा मागच्या जन्मीचा पुण्याचा घडा रिकामा असणार हे मलाही जाणवतंय...'_
मास्तरांना आठवूनही हसू फुटलं आणि डोळे पाणावले. आनंदी होतीच तशी, अफाट निर्विष विनोदबुद्धीची, हजरजबाबी, उत्साही, आपल्या नावाला जागणारी आणि हवीहवीशी वाटणारी.
मास्तर कोळ्याच्या जाळ्यात किडा अडकावा तसे ते आठवणींच्या जाळ्यात अडकून बसले. बाहेर निघायची घाई नव्हतीच तशीही त्यांना. मास्तर त्यांच्या पंचविशीत कधी शिरले ते त्यांचं त्यांनाच कळलं नाही.

--------------

चिपळूणचा माधव दातार बी.ए. झाला  आणि तडक गुहागरच्या शाळेत मास्तर झाला.

मुंबईला मंत्रालयात नोकरी मिळत असताना त्यांनी ती केली नाही. स्वखुशीनी त्यांनी पायावर धोंडा पाडून घेतला.

इन मीन दोन खोल्यात भरणारी ती पाचव्या इयत्तेपर्यंतची शाळा, मुलांच्या हजेरीएवढाच तुटपुंजा पगार.
माधव दिसायचा कडक पण शिकवायला लागला की ऐकत रहावं नुसतं. काहीही समजलं नाही तरी मुलाला काय तरी वेगळं ऐकतोय असं वाटायला लावणारं.
       तो पोरात पोर होऊन कानगोष्टी केल्यासारखं शिकवायचा. इतिहासाच्या धड्याची नाट्य रुपांतरं करायचा आणि नाटक चालू असतानाच थांबवून आत्तापर्यंत काय काय कळलं ते विचारायचा. येताना बाहुलीच्या गोळ्या आणून टेबलावर ठेवायचा, त्या मांडून गणित शिकवायचा आणि बरोबर उत्तर देईल त्याला त्या गोळ्या द्यायचा.
जीवशास्त्र असो नाहीतर अजून कुठला विषय असो दातार मास्तर शिकवणार म्हटलं की पोरांना  _"त्यात काय अवघड"_  असं वाटायचं.
     शाळेला लागून असलेल्या दोन गुंठ्यांवर मास्तरांना रहायला गावाने घर बांधून दिलं. मास्तर गावकुटुंबातील एकजण झाले. माधव ज्यांच्याकडे जेवायला जायचा त्या बापटांची भाची होती हरिहरेश्वरला.... *रमा केळकर.*
एका सुदिनी बापटांनी मुहूर्त काढला आणि माधवचे चार हात केले.
     सुखवस्तू घरातील रमा मामाच्या शब्दावर हो म्हणाली " मुलगा चांगला आहे, एकटा आहे, निर्व्यसनी आहे, पैशांनी कमी आहे पण बुद्धीनी कुबेर आहे, तुझा लक्ष्मीचा हात फिरला की होईल सगळं नीट..."_

मोठा विजोड होता जोडा खरंतर...
पाच फुटाला इंचभर कमीच रमा,  तशी _गोल चेहऱ्याची,  गोबऱ्या गालांची,  लिंबकांतीची,  बोलक्या डोळ्यांची,  डाळींबी ओठांची आणि  कापूस गाठीसारखी स्थूल देहाची होती. शरीराचा भाग असल्यासारखं स्मित तिच्या चेहऱ्यावर होतं. पिवळ्या अंगानी ती घरात शिरली आणि माधवच्या दोन खोल्यांना तिने राजमहाल करून टाकलं.
गुहागरला आल्यावर सवयीने दुसऱ्या दिवशी माधव सकाळी रोजनिशी लिहायला बसला. मागून डोकावत आनंदी म्हणाली, " सगळं खरं लिहिणार...? कुणाच्या हातात पडली तर पंचाईत होईल हो.."
     माधव अवाकच झाला, किती बिनधास्त आहे ही. माधवची नवरा म्हणून भीती तिला पहिल्या दिवसापासून वाटली नाही. तिच्यातलं ते लहान मुल माधव अनिमिष नजरेनी बघत रहायचा.
एकदा रात्री त्याने तिला विचारलं, " तू असं बूटबैंगण, मला कसं हो म्हणालीस...?"_
आनंदी लगेच म्हणाली, " छ्या, उलट मलाच फायद्याचं, मी आयुष्यंभर तुमच्याशी मान वर करून बोलणार आणि तुम्ही मान खाली घालून."

एकदा संध्याकाळी बापट घरी आलेले..." माधव....,  हे  "नाव बदलतात" ते ठिक आहे पण तुमचा नावांचा योग जुळून आला होता.... खरं तर चांगला - 'रमा अन माधव' उगीच बदललंस खरंतर."_
माधव काही बोलायच्या आत आनंदी म्हणाली," बरं झालं ते बदललं ते, नाहीतर पेशव्यांसारखा यांना *राजयक्ष्मा* झाला तर काय केलं असतंत...?"
     ती रांगोळी तर अशी रेखीव आणि सुबक काढायची की बघत रहावं. माधव एकदा म्हणाला," किती गुण गं तुझ्या अंगात, मी असा भणंग मास्तर, कशाला हो म्हणालीस मला, चांगली राणीसारखी राहिली असतीस श्रीमंताकडे आनंदात..."
आनंदी गंभीर चेहरा करून म्हणाली, " खरंय, मलाही वाटतं आताशा, माझं चुकलंच. पण तुमच्या शाळेतली मुलं डोळ्यापुढे आली. बिनलग्नाचा कातावलेला मास्तर मारझोड करणार म्हणजे त्या पोरांचं नुकसान, म्हणून केलं मी..." माधवलाही असं वारंवार निरुत्तर व्हायला आवडायचं. आनंदी असे विनोदाचे अत्तरसडे जाता - येता टाकायची आणि परिस्थितीच्या निवडुंगात मोगऱ्याचं पीक काढायची. मागणं हा स्वभाव नव्हताच तिचा... सतत देत राहिली.
   तिचे वडील गेले. मग एक दिवशी भाऊ आणि वहिनी आले, " ताई, तुला काय काय हवंय सांग इस्टेटीतलं, तू म्हणशील त्याला मी तयार आहे.." म्हणाले. आनंदी क्षणाचा विलंब न करता म्हणाली, " मला काहीही नकोय, आत्तापर्यंत ज्या प्रेमानी वागलास ते कायम ठेव म्हणजे झालं. ते कमी झालेलं दिसलं तर मात्रं कोर्टात खेचेन वाट्याकरता." आनंदी आरशाच्या चेहऱ्याची होती, सगळं कसं स्वच्छ प्रतिबिंब. माधवनी कष्ट घेत शाळा वाढवली आणि तो मुख्याध्यापक झाला पण सगळं गाव त्याला  'दातारमास्तरच'  म्हणायचं.
आनंदीने अभिमानाने दारावर पाटी करून घेतली होती  'श्री.माधव दातार - मुख्याध्यापक.'
माधव म्हणाला, " अगं, पाटी काय करायचीये, ते काय राष्ट्रपतीपद आहे का...?"

आनंदी म्हणाली," असू दे, कुणी नवखा आला तर..? आपल्या दोघात चेहऱ्यावरून नाही कळत पण निदान पाटी वाचून तरी त्याला वाटेल की हा माणूस बायकोपेक्षा जास्ती शिकलेला दिसतोय." तसं आनंदीही अकरावी पर्यंत शिकलेली होती.

माधवनी आयुष्यात एकदाच फक्त तिला दु:खानी रडलेलं पाहिलं होतं. शाळेचा दहावीचा रिझल्ट होता. कुळवाड्याचं पोर शाळेत पहिलं आलेलं. त्याच्या आई वडिलांना कळण्याच्या पलीकडचं होतं सगळं. दोघंही माधवच्या घरी काम करायचे आणि ते पोर ही हुशार होतं. पुढचा खर्चही माधवच करणार होता. मुलाचं कौतुक होताना बघून त्याच्या आईचा फुललेला चेहरा बघून आनंदीला भरून आलं, न्यून जाणवलं आणि पटकन तिने डोळे पुसले. माधवच्या नजरेतून ते सुटलं नाही. सुखी आयुष्यात तेवढी एकच खंत होती  खरंतर...  पण दोघांनी कधीही त्यावर राग राग केला नाही की आदळआपट केली नाही. आनंदीचं उत्तर असायचं," करायचीयेत काय व्रत करून...? उगाच एक दोन मुलं नकोयेत आणि मला, गांधारीचं कुठलं व्रत असेल तर सांगा."_
त्यादिवशी रात्री माधवनी जवळ घेतलं आणि आनंदी बांध फुटल्यासारखी फुटली. दोघांनाही न बोलता कळायचं सगळं. मोकळी झाल्यावर ती म्हणाली, " परत नाही कधी रडणार आता, नसेल नशिबात तर नसू दे, नाही त्याचं दु:ख कशाला, त्याने आहे त्याचा आनंदही नासतो. आपलं विरजण नाही लागलं त्याला काय करणार आणि एक बरंय की लोकांसारखी घोटाळा होण्याची भीती नाही आपल्याला, न घाबरता आनंद मिळतोय की..."आणि हसायला लागली. माधवनी मग तिला अजून जवळ घेतलं.
        वर्षामागे वर्ष गेली, पिढ्या आल्या आणि शिकून गेल्या. साठाव्या वर्षी दातार मास्तर पेन्शनीत निघाले पण शाळेने घर त्यांनाच दिलं होतं. शाळेची प्रगती मास्तर कौतुक नजरेनी पहात होते आणि सुखावत होते. तिच्या भावाचा मुलगा दिनकर आलेला एकदा... " काका रिटायर्ड झालात ना, दोघंही चला मुंबईला माझ्याकडे कायमचे, मलाही आता मोठं कुणी नाही घरात..." आनंदी म्हणाली, " अरे, दुरत्वात प्रेमाला उधाण असतं. नाती फार जवळ आली की त्याची वर्तमानपत्र होतात, चटकन शिळी होतात. इथे बघ, हे पंचम जॉर्ज आणि मी एलिझाबेथ. पण काळ काही सांगून येत नाही, वाटलंच तसं तर मात्रं हक्काने येईन, पण येत रहा रे असाच वरचेवर, तुझ्या शिवाय तरी मला कोण आहे माहेरच्या मायेचं. आयुष्याच्या सातबाऱ्यावरून आमचं नाव कधी कमी होईल सांगता येत नाही आता." भरल्या डोळ्यांनी तो गेला.
      " काय हो, तुम्हांला जायचं मनात नाही ना..? नाही तर नंतर म्हणाल, मला जायचं होतं." माधवनी फक्तं हसून तिच्या डोळ्यातलं पाणी टिपलं.
      दोघंजण उन्हं उतरत आली की अंगणात खुर्च्या टाकून बसायचे. रस्त्यानी जाणारा प्रत्येक जण काही न काही बोलून पुढे जायचा. मग त्या माणसाच्या कुठल्या न कुठल्या आठवणीत ते रमून जायचे, विद्यार्थी यायचे, भरभरून बोलायचे, नमस्कार करून भरल्या डोळ्यांनी परत जायचे. मास्तर हल्ली फार हळवे झाले होते. पटकन गहिवरून यायचं त्यांना.
        एकदा असेच अंधार पडला तरी ते बोलत बसले होते. मास्तर एकटेच बोलत होते. तक्रार काहीच नव्हती. आठवणींच्या चंदनाचे सुखाचे वळसे होते फक्त....
आनंदी एवढंच म्हणाली, " मला काही तुमच्यासारखं मोठं मोठं नाही बोलता येत. पण मी जे काय जगले ते आनंदात जगले, शेवटी प्रेम म्हणजे काय असतं हो...?  न सांगता मनातलं समोरच्याला समजतं ते प्रेम असतं. तुम्हाला काय मला काय, कधी सांगावं लागलं नाही एकमेकाला. हल्ली हळवे झाला आहात तुम्ही फार, दोघांनाही वाटतंय एकत्र उतरू... शेवटच्या स्टेशनला, पण ते काही आपल्या हातात नाही. पण जो शेवटी उतरेल त्याने मात्र रडत, कुढत नाही करायचा तो प्रवास एवढं लक्षात ठेवा, चला उठा, आयुष्याची आणि दिवसाची संध्याकाळ झाली, पण आहोत तोवर दिवा लावायचाच."

--------------      

         सगळं आठवून मास्तरांनी पंचाला डोळे पुसले. मास्तर आजवर तसंच जगले होते, न कुढता, न रडता. आनंदी आयुष्यात आल्यापासूनचा चाळीस वर्षाचा प्रवास केवढ्या गतीनी झाला. चाळीस वर्ष आणि ती गेल्यानंतरची ही दहा.
     दिनकर बोलावून थकला पण मास्तर काही गेले नाहीत मुंबईला. त्यांचाच विद्यार्थी शाळेत मास्तर झाला होता. त्याची बायको डबा द्यायची, ती ही त्यांचीच विद्यार्थिनी. आनंदी गेल्यापासून ते एकवेळ जेवायचे. दोन वेळचा चहा स्वत: करायचे.
     रसिका डबा घेऊन आली आणि मास्तर भानावर आले... " अगो, आणलायेस खरा डबा तू, पण मला भूक नाही, घेऊन जा आज परत."  " मला माहितीये, दहा वर्ष झाली ना आज...? सगळं काकूंच्या आवडीचं आणलंय. त्यांची चव नाही माझ्या हाताला पण केलंय मात्र त्यांनी जसं शिकवलेलं तसंच..!!'  " नाही ग,  तू सुगरणच आहेस, घोटाळा माझ्या बाजूला आहे. अन्न तेच आहे पण त्याची चव ती घेऊन गेली बघ.  असो, तू एवढ्या मायेनी आणतेस, ठेव, खाईन मी...  थांब, जेवूनच घेतो, आजपासून बसशील जेवेपर्यंत? भूतासारखं वाटतं ग आताशा, घास जात नाही घशाखाली." रसिकानी हुंदका आवरला आणि तिने डबा उघडायला सुरवात केली.

सावरलेले मास्तर तिला म्हणाले, " तुला सांगतो रसिके, चाळीस वर्ष फक्त सुख दिलन तिने मला, मी ओव्हरड्राफ्ट घेतला होता सुखाचा, त्याचे हप्ते भरतोय बघ गेली दहा वर्ष, अजून किती बाकी माहित नाही..."_

जयंत विद्वांस
पूर्वी
चार ढग एकत्र आले
की मुसळधार पाऊस पडायचा.
आता आभाळ ढगांनी अंधारले
तरी थेंब निथळत नाही.

पूर्वी
विहिरीत नुसता हात टाकला
की हाताला पाणी लागायचं.
आता बुडाशी जाऊन बसलं
तरी ओंजळ भरत नाही.

पूर्वी
माणसाच्या खांद्यावर हात ठेवला
की आपुलकीचा झरा वाहायचा
आता ह्रदयात हात घातला
तरी ओल लागत नाही.

थोडक्यात :
हे ढग काय ,
ही विहीर काय ,
हा माणूस काय ...
चराचरातून ओलावा आटत चाललंय हेच खरं  !

माती आणि  नाती
यांतला ओलावा जपुया

Sunday, April 2, 2017

मातृ म्हणा मदर म्हणा आई शब्दात जीव आहे
पिता म्हणा पप्पा म्हणा , बाबा शब्दात जाणीव आहे
सिस्टर म्हणा दीदी म्हणा ताई शब्दात मान आहे
फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा मित्रा शब्दात शान आहे

एन्ड म्हणा फिनिश म्हणा अंत शब्दात खंत आहे
दिवार म्हणा,  वॉल म्हणा भिंत शब्द जिवंत आहे
रिलेशन म्हणा रिश्ता म्हणा नातं शब्दात गोडवा आहे
एनिमी म्हणा, दुश्मन म्हणा वैर शब्द जास्त कडवा आहे

हाय म्हणा, हॅलो म्हणा, हात जोडणे संस्कार आहे
अतिथी देव मानून करतो नमस्कार आहे
आंग्ल लिपी शिकून झाले बुद्धीचे खिंडार आहे
अ ते ज्ञ शब्दात  ज्ञानाचे भांडार आहे

सर म्हणा, मॅडम म्हणा, गुरु शब्दात अर्थ आहे
गूण रूप देणारा दाता निस्वार्थ आहे
ग्रँड पा ग्रँड माँ शब्दात काही मजा नाही
आजोबा,आणि आजी सारखे नाते सुंदर जगात नाही

गोष्टी सर्व सारख्या पण फरक फार अनमोल आहे
मराठी भाषेचा अर्थ जेवढा कळेल तेवढा खोल आहे

Friday, March 31, 2017

प्रिय सखी..

मी म्हणते बिनधास्त जग
चिंता नको करू
कुणा बद्दल मना मध्ये
राग नको धरू  

जे काय वाईट घडलं
त्याला लाव काडी
वर्तमानात जग जरा
मजा घे थोडी

संकट येत राहतील
घाबरून नको जाऊ
कोणत्याच गोष्टीचा
करू नको बाऊ

भिऊ भिऊ रोजच जगतेस
जरा मोकळा श्वास घे
मित्र-मैत्रिणी जवळ कर
आणि थोडी मजा घे  

चौकटीत राहून राहून
कंटाळा येणारच
चार चौघात बसल्यावर
दुःख पळून जाणारच

स्त्री झाली म्हणून काय
तिला मन नसतं का ?
गुलाबी , लाल रंगाचं
तिचं वाकडं असतं का ?

शेजारणींनी , मैत्रिणींनी
एकत्र आलं पाहिजे
रंग खेळून मन कसं
चिंब झालं पाहिजे

मोठं झाल्या नंतर सुद्धा
लहान होता येतं
मुखवटा न घालता
आयुष्य जगता येतं  

गप्पा मार , जोक सांग
खळखळून हास
अर्धी भाकरी जास्त घे
म्हणू नको बास  

मन मोकळं जगल्यानं
ब्लडप्रेशर होतं कमी
अटॅक बिटॅक येणार नाही
याची अगदी नक्की हमी  

गप्पातल्या lnsulin ने
Sugar कमी होते
हृदयाच्या ठोक्यांची
गती धीमी होते

धुळवड साजरी करणं म्हणजे
वाया जाणं नसतं
गडगडाटी हंसणं म्हणजे
खरं Tonic असतं

एक दिवस पत्ते खेळल्यानं
जुगारी थोडंच होतं
टेन्शन कमी झालं की
जगणं सोपं होतं      

कोणत्याही व्यसनाच्या
आहारी नकोस जाऊ
गाण्याच्या मैफिलीत
रडगाणं नको गाऊ

कितीही चांगलं वागलं तरी
जग वाईटच म्हणणार आहे
तुझा कोण भव्य - दिव्य
पुतळा वगैरे उभारणार आहे  ?

म्हणून म्हणते आता तरी
मनावरचं ओझं झुगारून दे
मोकळेपणाने श्वास घेऊन बघ
आणि.....थोडं जगून घे 

Friday, March 17, 2017

एखाद्या रात्री कधीतरी
जमा होतात सावल्या,
गरम होतात डोळे नि
तडतडतात बाहुल्या...

मुक्यानेच सांगू लागतं
दुखलेलं पाणी,
“इतकं हळवं चुकूनसुद्धा
असू नये कोणी..."

गाऊ नये कोणी कधी
उदास उदास गाणी,
कळावीत सारी दुःखं
इतकं होऊ नये ज्ञानी...

वाचूच नये मुळात कुठलं
जाडजूड पुस्तक,
विचारांपासून शक्यतो
दूर ठेवावं मस्तक...

जशी नजरेस दिसतात
तशीच पहावीत चित्रं,
जसे आपल्याशी वागतात
तसेच समजावेत मित्र...

उगाच फार खोल आत
नेऊ नये दृष्टी,
खऱ्या समजाव्यात
साऱ्या सुखांताच्या गोष्टी...

पेनाच्या जिभेवरच
सुकू द्यावी शाई,
फार त्रास होईल
असं लिहू नये काही...

हळवं बिळवं करणारे
मुळात जपूच नयेत छंद,
करून घ्यावीत काळोखाची
सगळी दारं बंद...

सायंकाळी एकटं एकटं
फिरू नये दूर,
समुद्रकिनारी लावू नये
आर्त, उत्कट सूर...

चालू नये सहसा फार
ओळखीची वाट,
भेटलंच अगदी कुणी
तर मिळवावेत हात...

जमल्यास चारचौघात
बघावं थोडं मिसळून,
लहान मुलासारखं कधीतरी
भांडावं उसळून...

आवडणार नाही
पंचमीच्या चंद्राची कोर,
एवढंसुद्धा कोणी कधी
होऊ नये थोर...

घट्ट घट्ट बसलेल्याही
सुटतातच गाठी,
कपाळावर म्हणून सारखी
आणू नये आठी...

साकळू देऊ नये फार
खोल खोल रक्त,
कुणापाशीतरी नियमित
होत जावं व्यक्त...

माणसांचं मनास
लावून घेऊ नये फार,
होऊ द्यावा थोडा हलका
त्यांचासुद्धा भार...

तुटून जावीत माणसं
एवढं पाळू नये मौन,
वरचेवर करत जावा
प्रत्येकालाच फोन...

ठेऊ नये जपून
वहीत पिंपळाचं पान,
साध्यासुध्या गोष्टीत
असा गुंतवू नये प्राण...

जमा होत राहील
सारखा पापणीआड थेंब,
इतकंसुद्धा मन लावून
करू नये प्रेम...

श्वास घेणंसुद्धा अगदीच
वाटू लागतं व्यर्थ,
शोधत बसू नये म्हणून
जगण्याचा अर्थ...

वाटलं जर केव्हा
सगळं सगळं आहे शून्य,
आहे हे असं आहे
हे करून घ्यावं मान्य..”

इतकं समजावूनसुद्धा
जमा होतात सावल्या,
गच्च गच्च होतात डोळे,
थरथरतात बाहुल्या.......

Tuesday, March 14, 2017

Very beautifully written by Gulzar, the man who dedicates his book to 'Rakhi-the longest short story of my life' with grace

लोग सच कहते हैं -
औरतें बेहद अजीब होतीं है

रात भर पूरा सोती नहीं
थोड़ा थोड़ा जागती रहतीं है
नींद की स्याही में
उंगलियां डुबो कर
दिन की बही लिखतीं
टटोलती रहतीं है
दरवाजों की कुंडियाॅ
बच्चों की चादर
पति का मन..
और जब जागती हैं सुबह
तो पूरा नहीं जागती
नींद में ही भागतीं है

सच है, औरतें बेहद अजीब होतीं हैं

हवा की तरह घूमतीं, कभी घर में, कभी बाहर...
टिफिन में रोज़ नयी रखतीं कविताएँ
गमलों में रोज बो देती आशाऐं

पुराने अजीब से गाने गुनगुनातीं
और चल देतीं फिर
एक नये दिन के मुकाबिल
पहन कर फिर वही सीमायें
खुद से दूर हो कर भी
सब के करीब होतीं हैं

औरतें सच में, बेहद अजीब होतीं हैं

कभी कोई ख्वाब पूरा नहीं देखतीं
बीच में ही छोड़ कर देखने लगतीं हैं
चुल्हे पे चढ़ा दूध...

कभी कोई काम पूरा नहीं करतीं
बीच में ही छोड़ कर ढूँढने लगतीं हैं
बच्चों के मोजे, पेन्सिल, किताब
बचपन में खोई गुडिया,
जवानी में खोए पलाश,

मायके में छूट गयी स्टापू की गोटी,
छिपन-छिपाई के ठिकाने
वो छोटी बहन छिप के कहीं रोती...

सहेलियों से लिए-दिये..
या चुकाए गए हिसाब
बच्चों के मोजे, पेन्सिल किताब

खोलती बंद करती खिड़कियाँ
क्या कर रही हो?
सो गयी क्या ?
खाती रहती झिङकियाँ

न शौक से जीती है ,
न ठीक से मरती है
कोई काम ढ़ंग से नहीं करती है

सच है, औरतें बेहद अजीब होतीं हैं ।

कितनी बार देखी है...
मेकअप लगाये,
चेहरे के नील छिपाए
वो कांस्टेबल लडकी,
वो ब्यूटीशियन,
वो भाभी, वो दीदी...

चप्पल के टूटे स्ट्रैप को
साड़ी के फाल से छिपाती
वो अनुशासन प्रिय टीचर
और कभी दिख ही जाती है
कॉरीडोर में, जल्दी जल्दी चलती,
नाखूनों से सूखा आटा झाडते,

सुबह जल्दी में नहाई
अस्पताल मे आई वो लेडी डॉक्टर
दिन अक्सर गुजरता है शहादत में
रात फिर से सलीब होती है...

सच है, औरतें बेहद अजीब होतीं हैं

सूखे मौसम में बारिशों को
याद कर के रोतीं हैं
उम्र भर हथेलियों में
तितलियां संजोतीं हैं

और जब एक दिन
बूंदें सचमुच बरस जातीं हैं
हवाएँ सचमुच गुनगुनाती हैं
फिजाएं सचमुच खिलखिलातीं हैं

तो ये सूखे कपड़ों, अचार, पापड़
बच्चों और सारी दुनिया को
भीगने से बचाने को दौड़ जातीं हैं...

सच है, औरतें बेहद अजीब होतीं हैं ।

खुशी के एक आश्वासन पर
पूरा पूरा जीवन काट देतीं है
अनगिनत खाईयों को
अनगिनत पुलो से पाट देतीं है.

सच है, औरतें बेहद अजीब होतीं हैं ।

ऐसा कोई करता है क्या?
रस्मों के पहाड़ों, जंगलों में
नदी की तरह बहती...
कोंपल की तरह फूटती...

जिन्दगी की आँख से
दिन रात इस तरह
और कोई झरता है क्या?
ऐसा कोई करता है क्या?

सच मे, औरतें बेहद अजीब होतीं हैं..

(हमारे जीवन में ख़ुशी, समर्पण और प्रेम बरसाने वाली हर महिला को सादर समर्पित)
🌺🌺🌺🌺

Friday, March 10, 2017

" सुख ओरबडण्याची शर्यत "

"

सुख ओरबडण्याच्या शर्यतीत
सामील होऊ नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा

प्रेम , त्याग , सहनशीलता
ठेवावीच लागेल
आपल्या माणसाशी नातं तोडून
कसं काय भागेल ?

कौतुक करणारं असेल तर
मोठं होण्याला अर्थ असतो
लाखोंचं इंटेरियर करून सुद्धा
माणूस का उदास दिसतो ?

सुबत्तेच्या विळख्या मधे
खरंच सापडू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा

जगाशी मैत्री करतांना
मूळं  का उपटावीत
दूरचे जवळ घेतांना
सख्खे दूर का लोटावीत ?

पाणी आणि मृगजळ यातला
फरक लक्षात घ्या
नातं तोडणाऱ्या अहंकाराला
तिलांजली द्या

इतरांच्या सुखदुःखात
सामील व्हावच लागेल
तरंच  सोनेरी महाला मध्ये
तुमचं मन लागेल

मृत्यू जवळ दिसल्या नंतर
उपयोग काय ' नाती ' आठवून ?
जन्मभर का जगायचं
प्रेम आणि अश्रू गोठवून

आयुष्य फार छोटं आहे
दिवस भुर्रकन उडून जातील
Whats app , Face book वरून
फक्त " R I P " चे मॅसेज येतील

रक्ताच्याच नात्या मधील
काही डोळ्यात पाणी असेल
तुमच्या लेकरां-बाळा जवळ
काका , आत्या , मावशीच असेल

मतभेद जरी असतील काही
बसून , बोलून संपऊन टाका
ताठरपणा सोडून देऊन
बहीण , भावाला मारा " हाका "

Week end ला मॉल मध्ये
Aim less भटकू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा

मनाचं रंजन करण्यासाठी
माणूसच लागत असतो
संपत्ती कितीही असली तरी
" गप्पाची भीक " मागत असतो

नशिबाने मिळालेली
प्रेमळ नाती तोडू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा .

Sunday, February 26, 2017

आज चा दिवस, २७ फेब्रु., कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्म दिवस. ह्या निमित्ताने त्यांची आठवण.
स्वत:च्या कविते विषयी त्यांची भावना.....
समिधाच सख्या या....

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवनसरिता,
खळखळे, अडखळे, सुके कधी फेसाळ
परि अखंड शोधे वाट समुद्राकारिता !

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली !

नव पर्णाच्या या विरल मांडवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
" या जळोत समिधा - भव्य हवी वृक्षाली ! "

समिधाच सख्या या , त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा
जात्याच रुक्ष या , एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा !

खरोखरच ह्या आणि अश्यांसारख्या असंख्य मराठी कविता तुमच्या आमच्या मनामधे क्षणभर तरी हा अग्नी फुलवतील ह्याच या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा !!

मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन -      

होत्या लाटा उधळीत आपुली फेनिल कविता
फुलाफुलांतून अखंड उमलत होती नवता
होते वारे वाहत, तारे होते चमकत
बाभळीवर ही गुच्छ फुलांचे होते लगडत
रे कसे वेगळे म्हणू सांग तुज यांच्यापासून??
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

उठूनि पहाटे जावे तर तू रंगच व्हावे
नभी पहावे तर तू ढग होऊन झुलावे
या धारातून तुझे कृपामाय हात दिसावे
किरणांच्या अधरांवर स्मित ताव फुलावे
हे डोळे भरुनी बघतो आहे सारे आनुंदीन
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

तू नाहीस? या वसंतातुनी कोण फुले मग?
तू नाहीस? दवबिंदूत का मग झगमग झगमग
तुझ्यावाचुनी बीजांमधूनी कोण फुले रे?
तुझ्यावाचुनी रांगांमधून कोण फुले रे?
मी कधी न पाहिले तुझे निराळेपण त्याच्याविण
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

हेलावे जनसागर माझ्या अवतीभवती
खरे सांग, ही नाना रूपे तुझीच नव्हती?
मनामनातून त्यांच्या होती तुझी चेतना
कर्माकर्मातून  होती तुझी प्रेरणा...!
मी कसे उणे तुज करू त्यांचिया सुखदुःखातुन ?
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

तुला पाहिले ऋतुंऋतुंतुन, फुलाफुलांतून
त्या गगनातुन, या मातीतून, स्थितिगतीतून
संघर्षातुन , सुखदुःखांतून , व्यथेव्यथेंतून
या सृष्टीतून अन भावतीच्या मानवतेतून
रे कसे शोधू तुज वेड्यापरी मी तुलाच टाकून?
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन


- मंगेश पाडगावकर
















Thursday, February 23, 2017

तिला विचारलंच नाही.

ज्या क्षणी पाहिले तिला...
होकार गृहीतच धरला...!
मी तुला आवडलो का...?
*तिला विचारलंच नाही...!!*

सप्तपदी चालतांना...
घुटमळली पाऊले तिची...!
हुरहुर कसली होती...?
*तिला विचारलंच नाही...!!*

माप ओलांडतांना उंबरठ्याचं...
मी आलो सहज आत...!
तुलाही यावंस वाटतंय का...?
*तिला विचारलंच नाही...!!*

झाली पहिली भेट...
किती आतुर होतो मी...!
ओढ तुलाही आहे का...?
*तिला विचारलंच नाही...!!*

वंशाला दिवाच हवा...
सांगून मोकळा झालो...!
पण आई व्हायचंय का...?
तिला विचारलंच नाही...!!

संगोपन करतांना मुलांचं...
कसरत होत होती तिची...!
गरज माझीही लागेल का...?
तिला विचारलंच नाही...!!

आयुष्यभर दिली साथ...
झाली सुख दु:खाची सोबती...!
कधी मन तिचं दुःखलं का...?
तिला विचारलंच नाही...!!

न मागताच तिच्याकडून...
घेतलं मी सारं काही...!
तुलाही काही हवं का...?
तिला विचारलंच नाही...!!

खरंच किती स्वार्थी झालो...
गृहीतच धरलं मत तिचं...!
तिचं मन काय म्हणतं...?
तिला विचारलंच नाही...!!

Wednesday, February 22, 2017

आई म्हणायची

आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.

आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.

आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.

आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.

आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.

आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.

आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.

आई म्हणायची अन्नावर
कधी काढू नये राग,
कोणाला लागली लाथ तर,
लावायची पाया पडायला भाग.

दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.

आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.

आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!

आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.

अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.

जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.

मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.

बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतात
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतात.

त्यांना  कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतात
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतात .

तुमचा शब्द ते कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
पेलत सगळी आव्हाने
घडवतात तुमचा भविष्यकाळ..

तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबाही खचत असतात
आधार देता तरी
मन मारून हसत असतात..

तुमच्याकडूनं तसं त्यांना
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्यांचं
अवघं पोट भरत असतं.

त्यांच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाहीत
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाहीत.”

त्यांच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल

तेव्हा म्हणाल, “ आपले बाबा
खरंच कधी चुकत नव्हते
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होते.”

तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.


Monday, February 20, 2017

त्रासाचे झाड

 दादांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे.

 कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. दादांना परिस्थिती सोसेनाशी झालेली.

 ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत दादा निघाले.

 संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले.

 दादांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’ भाचा दादांच्या गाडीत बसला.

 कार्यालयापासून २०मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही.

 गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता. घरी पोहोचल्यावर भाच्याने दादांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले.

 उशीर झालेला तरी दादा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून दादा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले.

 घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले.

दादांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम बदलूनच गेले.

त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, ‘‘पोचलो एकदाचा. किती छान वाटतंय आता. दादांसाठी मस्त चहा आण पाहू.

 समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले. दादांना हे सर्व पाहून प्रचंड आश्‍चर्य झाले.

ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला?

गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती की हे घरातले हसणे-खिदळणे आणि आनंद?

 दादांना प्रश्‍नच पडला. चहा घेऊन दादा निघाले. भाचा दादांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला.

गाडीत बसता बसता दादांनी भाच्याला विचारले ‘‘दोन गोष्टी कळल्या नाहीत बेटा.

त्या घराबाहेरील झाडाला तू काय केलेस आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे?’’

 त्यावर भाचा म्हणाला, ‘‘दादा, मी रोज घरी आलो की या झाडावर माझे सर्व त्रास टांगतो आणि आत जातो.

त्यामुळे मी घरी पोहोचताच प्रसन्न होतो. दुसर्‍या दिवशी घरून निघताना पुन्हा त्या झाडावरून उचलतो.

पण काल टांगलेले काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी त्रास झाडावर सापडतच नाहीत.

हे आहे ‘‘त्रासांचे झाड.’’ प्रत्येकाने आपल्या घराबाहेर असेच एक त्रासांचे झाड लावावे.

घरी जाताना त्रास बाहेर टांगून आत जावे. घरात फक्त आनंद असावा, त्रास नाही.

ती -





ती माझी मुलगी लग्न होऊन गेली
घरातली सारी किलबिल घेऊन गेली

माझ्या डोळ्यांपुढची वाट सारी धुकं धुकं झाली
तिची मांजरी, तिची पुस्तकं
तिची वाद्य, तिची घुंगर
लाडके कपडे व पत्रं
तिचे फोटो तिची चित्रं
कुणी गात नाही, हसत नाही
सगळ्यांना ती जाताना stachu  म्हणून गेली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली


इवली असल्यापासून इथे तिचंच राज्य होतं
जरा कुठे गेली की घर कावरबावर होत होतं
तिचं बोलणं , तिचं हसणं
रागानं कधी तणतण करणं
तिचं गाणं , तिचं नाचणं
मनापासून चित्र काढणं
तिच्यामुळे आमच्या घराची मैफल रंगत गेली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली


आमच्या गप्पा आमची गुपितं
आमचा स्वैपाक बाहेर जाणं
आमच्या टिंगल आमची भांडण
चिडवाचिडवी ,खरेद्या करणं
स्वप्नं चिंता वैताग सांगणं
एकमेकींना घडवत राहणं
पोकळी म्हणजे काय याची समज आली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली


बावीस  वर्ष मुलगी आपल्याला किती काय काय देते
वाढत्या वयात किती गोष्टी प्रेमानं शिकवत राहते
माया देते, धीर देते आपल्यासाठी तीच कळवळते
ओझं कसलं फुलपाखरू ते याची जण आली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली


तिच्या माझ्या धाग्याचं एक नातं विणलं आहे
तिचे वेगळे, माझे वेगळे रंग होणार आहे
नवं नातं विणण्यात आता ती गुंतली आहे
त्याचे रंग सुंदर वेगळे मला कळतं आहे
एकमेकींचा कोपरा झालो त्याची जाणीव झाली
ती माझी मुलगी लग्न होऊन गेली




शोभा भागवत





ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी गावीत

ज्यांच्या अंगणात ढग आले
त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे

ज्यांना आभाळाएवढी उंची लाभली
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे पाय मळले
त्यांना  थोडे उचलून घ्यावे.

                                   - दत्ता हलसगीकर 

हस्तांतर

हस्तांतर - द . भा . धामणस्कर


विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती अवजड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला ; द्या इकडे
मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून,
तर मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरंकल्याच्या ....
मी पुन्हा तरुण ययातीसारखा
माझा मुलगा जक्ख म्हातारा
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला.... 

शब्द

शब्द भावनांचे रूप
शब्द डोळियांचे सुख
शब्द वेदनेची वाणी
शब्द आनंदाची गाणी
 


                        शब्द  उफाळते लाव्हा
                        शब्द  सुखद गारवा
                        शब्द रुसवा फुगवा
                        शब्द प्रीतीचा ओलावा


शब्द निरागस बाल्य
शब्द मनातले शल्य
शब्द पावसाचे पाणी
शब्द जिवलग कोणी


                        शब्द ममतेचा हात
                        शब्द जिव्हारी आघात
                        शब्द अर्धभारवाही
                        शब्द त्यातून ही  काही 

Friday, February 17, 2017

हा लेख  सकाळमध्ये श्री प्रसाद इनामदार यांनी लिहिलेला आहे... खुप सुंदर लिहिले आहे .... 

ती........
..पत्राच्या वरच्या मायन्यामध्ये सुरवातीला काही ओळी रिकाम्या सोडल्यात. कारण तेथे काय लिहायचं हे सुचलेलं नाही म्हणून नव्हे तर तेथे किती आणि काय-काय लिहायचं यावरून माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजलेला आहे म्हणून. खरं तर खूप काही लिहावं, व्यक्त व्हावं, भावनांना वाट मोकळी करून द्यावी असं वाटूनही मी त्यांना बांध घालण्याचा प्रयत्न केलाय. कारण तेथे वापरावयाचे तोलामोलाचे शब्दच माझ्यावर रुसलेत. ते मला फितूरच होत नाहीत. कंटाळून मग मी तो प्रयत्न सोडून दिलाय. आता तुम्ही म्हणाल असं काय बुवा तेथे लिहिणार होतास? 

खरं तर मीही तोच विचार करतोय, आपण तेथे काय लिहिणार होतो? कारण मी जे लिहायचा विचार करतोय ते शब्दबद्ध करू शकेन हा विश्‍वासच माझ्या ठायी उरलेला नाही. कागद, पेन घेऊन सरसावून बसलोय खरा; पण तिच्याबद्दल मी विचार करू लागतो आणि "ती' मला असंख्य रूपांत भेटू लागते आणि मग त्यातल्या कोणत्याच रूपाला मी न्याय देऊच शकत नाही याची जाणीव मला मागे खेचून घेते कारण.... 

"ती' अंबिका..."ती' दुर्गा..."ती' सरस्वती..."ती' रणचंडिका..."ती' सीता..."ती' मंदोदरी..."ती' अहल्या..."ती' द्रौपदी..."ती' उर्मिला..."ती' सारा पुराण व्यापून राहिलेली त्यागाची मूर्ती... 
"ती' शिवबाला घडविणारी "जिजाऊ'..."ती' झाशीची राणी लक्ष्मीबाई...ती देशासाठी रक्त सांडलेली कणखर "इंदिरा', "ती' डेअरर किरण बेदी... 
"ती' वात्सल्यमूर्ती मदर तेरेसा... 
"ती' अनेक श्‍वासांना थबकवणारी गानकोकिळा लता... 
"ती' आयर्न लेडी... 
"ती'....ही यादी खूप मोठी...वाढतच राहणारी...कारण "ती' शब्दांत न मावणारी. 

...पण तरीही "ती' 
...माझी जन्मदात्री... वात्सल्यसिंधू... माझी दिशादर्शी... माझ्या पाऊलखुणा जपणारी...माझं बालपण हृदयात जपून ठेवणारी... जगाची ओळख करून देणारी... मुक्त विहरण्यासाठी माझ्या पंखांत बळ भरणारी... माझ्या यशासाठी कण कण झिजलेली... माझ्या इवल्याशा यशानेही आनंदून तृप्त झालेली...अजूनही होणारी... माझ्या चुका सुधारून मला जगण्याचं बळ दिलेली...देणारी....संसाराचा भार उचलून चेहऱ्यावर कष्टाचा मागमूसही न दाखविणारी... आणि खूप काही... माझी आई. 

"ती' माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी.... माझ्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेवून तिच्या आईला दुरावलेली....संसाराचा तोल सावरणारी...माझ्या यशावर जानसे फिदा झालेली.... माझ्यातल्या मला सावरणारी... मी चूक असलो तरी बरोबर मानून सप्तपदीचा मान राखणारी....हळुवार समजावणारी.... पत्नी.... प्रेयसी... माझी.... अर्धांगिनी.... माझ्या पिलांची "आई' आणि अद्यापही मला पुरती न उमगलेली माझी सखी. 

"ती' माझा अंश.... माझी प्रतिमा.... माझे प्रतिरूप.... माझ्या स्वप्नांची मुक्त भरारी.... छोट्याशा बाळमुठींतून माझ्या सुखांचे हळवे कोपरे समृद्ध करणारी.... माझ्यावर बिनधास्त विश्‍वासून आयुष्याला बेधडक सामोरी जाणारी.... सारं जग मुठीत घेऊन गगनाला गवसणी घालण्याची आकांक्षा बाळगणारी.... येणाऱ्या प्रत्येक क्षणांना भिडण्याची पात्रता अंगी बाळगणारी...."बाबा' या दोन शब्दांतून परमोच्च आनंद देणारी....सनई चौघड्यांच्या साक्षीने दुरावताना डोळे पुसून मलाच धीर देणारी... माझी चिमुरडी... माझी बालमैत्रीण.... 

"ती' बटवा घेऊन माझं बालपण जपणारी.... आयुष्यभराची शिदोरी पुरविणारी...ती संस्कारांचं बाळकडू पुरविणारी...माझ्या पाठी खंबीरपणे उभी राहणारी...चुकल्यावर कुशीत घेऊन समजावणारी.... माझ्यासाठी आईलाही "सुनावणारी' माझी मायाळू आजी.... 

या नात्यांशिवायही "ती' अनेक ज्ञात-अज्ञात रूपांतून भेटणारी...अमीट, असामान्य कामगिरी करणारी....जेथे आम्ही श्‍वास घेतो ती "वसुंधरा'....ती...."ती'....बस्स! आता मात्र किती लिहू आणि काय लिहू असं झालंय म्हणून थांबतो. 

आता आलं लक्षात, मी वरच्या मायन्यामध्ये काहीच का लिहू शकलो नाही. कारण माझ्यात "तिला' शब्दबद्ध करण्याचे बळच नाही. कारण "ती' अमर्याद, उत्तुंग, स्वच्छंद, गहिरी, अथांग, शब्दातीत आणि.... 
पाहिलंत असं होतं! 
"तिला' लाख-लाख प्रणाम!
When I started loving myself
I understood that I’m always and at any given opportunity
in the right place at the right time.
And I understood that all that happens is right –
from then on I could be calm.
Today I know: It’s called TRUST.

When I started to love myself I understood how much it can offend somebody
When I tried to force my desires on this person,
even though I knew the time is not right and the person was not ready for it,
and even though this person was me.
Today I know: It’s called LETTING GO

When I started loving myself
I could recognize that emotional pain and grief
are just warnings for me to not live against my own truth.
Today I know: It’s called AUTHENTICALLY BEING.

When I started loving myself
I stopped longing for another life
and could see that everything around me was a request to grow.
Today I know: It’s called MATURITY.

When I started loving myself
I stopped depriving myself of my free time
and stopped sketching further magnificent projects for the future.
Today I only do what’s fun and joy for me,
what I love and what makes my heart laugh,
in my own way and in my tempo.
Today I know: it’s called HONESTY.

When I started loving myself
I escaped from all what wasn’t healthy for me,
from dishes, people, things, situations
and from everyhting pulling me down and away from myself.
In the beginning I called it the “healthy egoism”,
but today I know: it’s called SELF-LOVE.

When I started loving myself
I stopped wanting to be always right
thus I’ve been less wrong.
Today I’ve recognized: it’s called HUMBLENESS.

When I started loving myself
I refused to live further in the past
and worry about my future.
Now I live only at this moment where EVERYTHING takes place,
like this I live every day and I call it CONSCIOUSNESS.

When I started loving myself
I recognized, that my thinking
can make me miserable and sick.
When I requested for my heart forces,
my mind got an important partner.
Today I call this connection HEART WISDOM.

We do not need to fear further discussions,
conflicts and problems with ourselves and others
since even stars sometimes bang on each other
and create new worlds.
Today I know: THIS IS LIFE!
कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते, गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते.... गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते, तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते.... अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात, चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात.... आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी, चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी ..........................
*सौ. सुधा मुर्ति*

बऱ्याच स्त्रियांना शारिरीक
सौंदर्याचा न्युनगंड असलेला,
मी समाजात, वावरत असतांना
माझ्या निरीक्षणात येतो...

पण, खर सांगू मैत्रिणींनो...
पुरूषांना कांय आवडेल,
याचा विचार करून स्वतःला
घडवू नका...

*पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य*
*तोलणं, म्हणजे स्वतः मधील*
*स्त्रीत्वाचं अधःपतन करवून*
*घेणं आहे...*

सकाळी उठून सडा-संमार्जन
झाल्यावर स्वतःच्या हातानं
काढलेली रेशीमरेषांची रेखीव
रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला
तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल...

स्वच्छ- सुंदर आवरलेलं, स्वच्छ
स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या
गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल...!

तुम्ही शिक्षिका असाल, तर
तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे
लिहिलेल्या अक्षरात असेल.
विषयाचं आकलन झाल्यावर
दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे,
ही तुमचीच सुंदरता आहे...

सौंदर्य कपड्यात नाही,
कामात आहे....

सौंदर्य नटण्यात नाही,
विचारांमधे आहे...

सौंदर्य भपक्यात नाही,
साधेपणांत आहे...

सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे...!!

आपण करत असलेलं
प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच
सादरीकरण असतं...!!

आपल्याला आपल्या कृतीतून
सौंदर्याची निर्मिती करता आली
पाहीजे...

प्रेमानं बोलणं
म्हणजे सुंदरता...!!

आपलं मत योग्य रीतीनं
व्यक्त करता येणं
म्हणजे सुंदरता...!!

नको असलेल्या गोष्टीला
ठाम नकार देण्याची हिंमत
म्हणजे सुंदरता...!!

दुसर्‍याला समजावून घेणं
म्हणजे सुंदरता...!!

आपल्या वर्तनातून, विचारातून
आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.

हाती आलेला प्रत्येक क्षण
रसरशीतपणे जगण्यांत
खरी सुंदरता आहे...!!

आपण करीत असलेल्या
कामात कौशल्य प्राप्त झालं,
की आपोआपच आत्मविश्वास
वाढतो, आत्मसन्मानाची
जाणीव येते...

*अशी आत्मविश्वासानं*
*जगणारी स्त्री आपोआप*
*सुंदर होते, हा माझा*
*स्वानुभव आहे...*

इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर
निर्णयक्षमतेत होतं,...

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या
ठोशात आहे...

बहिणाबाईंचं सौदर्य त्यांच्या
असामान्य प्रतिभेत होतं...

लतादीदींचं सौंदर्य त्यांच्या
अप्रतिम, दैवी आवाजात आहे...

वेळ प्रसंगी या सर्वजणींची
आठवणच आपलं जगणं
सुंदर करायला मदत करेल...

*आपण जशा जन्माला आलो*
*आहोत, तशा सुंदरच आहोत,*
*ही खूणगाठ मनाशी बांधून*
*टाकली, की सौंदर्याकरीता*
*दुसर्‍या कुणाच्या पावतीची*
*गरज पडत नाही आणि*
*अवघं विश्व सुंदर भासतं...!!!*



Thursday, February 16, 2017







न्यायमूर्ती रानडे यांनी   एक फार सुंदर कल्पना मांडली....

ते म्हणाले, " विश्वाची निर्मिती, उत्क्रांती करतानाही 'त्या'ला संगीताचा आधार घ्यावासा वाटला. कसं ते पहा...

प्रथम सा म्हणजे सागरात जीव निर्माण झाले...

नंतर रे म्हणजे रेतीत म्हणजे जमिनीवर जीव निर्माण झाले...

नंतर ग म्हणजे गगनात पक्षी निर्माण झाले...

नंतर म म्हणजे मनुष्याची निर्मिती झाली...

प म्हणजे मनुष्यात जो परोपकारी तो श्रेष्ठ...

त्यानंतर ध म्हणजे जो माणूस धर्माने वागतो तो श्रेष्ठ...

त्यानंतर नी म्हणजे जो इंद्रिय नियमन करतो तो जास्त श्रेष्ठ....

शेवटी वरचा सा म्हणजे ज्याला 'साक्षात्कार' झाला तो सर्वात श्रेष्ठ मनुष्य....

किती सुंदर कल्पना आहे जीवनाच्या उत्क्रांतीची...!!!
Don't know who wrote this... But beautiful

Somewhere between “Crying loudly to seek attention”
and “Crying silently to avoid attention”,
we grew up!!

Somewhere between
“Katti!!” and “Blocked”,
we grew up!!

Somewhere between
“ 7 pani puris for 1 rupee” and
“1 pani puri for 7 rupees”,
we grew up!!

Somewhere between
“Ground mai aaja” and
“Online aaja”,
we grew up!!

Somewhere between
“Craving for pizza” and
“Craving for home food”,
we grew up!

Somewhere between
“Believing in happy endings” and “Accepting the reality”,
we grew up!!

Somewhere between
“stealing eclairs of your sis” and “Bringing Silk for her”,
we grew up!!

Somewhere between
“Just five more mins Mom” and “Pressing the snooze button”,
we grew up!!

Somewhere between
“Broken Pencils” and
“Broken Hearts”,
we grew up!!

Somewhere between
“Crying out loud just to get what we want” and
“Holding our tears when we are broken inside”,
we grew up!!

Somewhere between
“We are Best Friends Forever” and “Knowing that nothing truly lasts”,
we grew up!!

Somewhere between
“I want to grow up” and
“I want to be a child again”,
we grew up!!

Somewhere between
“Lets meet and plan” and
“Lets plan and meet”,
we grew up!!

Somewhere between
“Eagerly waiting” and
“Forever waiting”,
we grew up!!

Somewhere between
“Parents fulfilling our wish” and
“We Fulfilling our parent’s dream”,
we grew up!!

Somewhere between
“Waking up at 6 am” and
“Sleeping at 6 am”,
we grew up!!

And as we grew up, we realized how, silently but surely ,our lives have changed...!! 😊




प्रा. गुरुराज गणेश गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली आणि प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढविणारी, स्वाभिमान उंचावणारी कविता....  त्यांच्याच "चांदणझुला" मधून एक नवी कोरी कविता......

"जगणं विसरू नकोस...."

"सखे,"
जगाकडे रोज नव्याने..
बघणं विसरू नकोस....
सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुला निराश करणारे
अनेक क्षण येतील...
पाय घालून पाडणारे
अनेक जण येतील...

त्यांना घाबरून तुझं तू
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असं नाही...

कौतुक मिळवण्यासाठी, काम
करणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुला सुद्धा मन आहे
याचा विचार कर...
बदलवणा-या मानसिकतेचा
जोरात प्रचार कर...

काळजापासून माया तुझी
झरणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

रडावंसं वाटेल तेव्हा
रडून मोकळी हो...
लढावंसं वाटेल तेव्हा,
लढून मोकळी हो....

रडण्यामध्ये तुझं तू
लढणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुला कुणाला पुरावे
द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला परतून
यायची गरज नाही....

ध्येयासाठी पुढेपुढे
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

कवी गर्दे यांनी स्वतः मला mail through त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे तो खालीलप्रमाणे
प्रा. गुरुराज गणेश गर्दे- ०9422058288