Monday, February 20, 2017

हस्तांतर

हस्तांतर - द . भा . धामणस्कर


विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती अवजड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला ; द्या इकडे
मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून,
तर मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरंकल्याच्या ....
मी पुन्हा तरुण ययातीसारखा
माझा मुलगा जक्ख म्हातारा
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला.... 

No comments:

Post a Comment