Monday, February 20, 2017

ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी गावीत

ज्यांच्या अंगणात ढग आले
त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे

ज्यांना आभाळाएवढी उंची लाभली
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे पाय मळले
त्यांना  थोडे उचलून घ्यावे.

                                   - दत्ता हलसगीकर 

No comments:

Post a Comment