Thursday, February 16, 2017

प्रा. गुरुराज गणेश गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली आणि प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढविणारी, स्वाभिमान उंचावणारी कविता....  त्यांच्याच "चांदणझुला" मधून एक नवी कोरी कविता......

"जगणं विसरू नकोस...."

"सखे,"
जगाकडे रोज नव्याने..
बघणं विसरू नकोस....
सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुला निराश करणारे
अनेक क्षण येतील...
पाय घालून पाडणारे
अनेक जण येतील...

त्यांना घाबरून तुझं तू
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असं नाही...

कौतुक मिळवण्यासाठी, काम
करणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुला सुद्धा मन आहे
याचा विचार कर...
बदलवणा-या मानसिकतेचा
जोरात प्रचार कर...

काळजापासून माया तुझी
झरणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

रडावंसं वाटेल तेव्हा
रडून मोकळी हो...
लढावंसं वाटेल तेव्हा,
लढून मोकळी हो....

रडण्यामध्ये तुझं तू
लढणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुला कुणाला पुरावे
द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला परतून
यायची गरज नाही....

ध्येयासाठी पुढेपुढे
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

कवी गर्दे यांनी स्वतः मला mail through त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे तो खालीलप्रमाणे
प्रा. गुरुराज गणेश गर्दे- ०9422058288

1 comment:

  1. नमस्कार, मी गुरुराज गणेश गर्दे. डीएसके विश्व धायरी पुणे येथे असतो.
    आपण आपल्या भिंतीवर माझी हि कविता प्रकाशित केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.

    आपण आपल्या भिंतीवर प्रकाशित केलेली "जगणं विसरू नकोस...." ह्या कवितेच्या खाली माझा कवी म्हणून माझे नाव खोडून त्यातील फक्त माझ्या वडिलांचेच नाव घेऊन ही कविता सर्वदूर फिरत आहे, म्हणून हे नमूद करणे क्रमप्राप्त सझालेले आहे.

    "जगणं विसरू नकोस...." ही कविता माझी आहे... आपण तसा उल्लेख केलात तर मी अत्यंत आभारी राहीन. तरी तसा उल्लेख करणे आवश्यकच आहे. सोबत माझा मोबाईल नंबर पण देत जा.... Gururaj Garde 9422058288

    तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,
    आपला विनम्र
    प्रा. गुरुराज गणेश गर्दे
    समुपदेशक,
    घरचा पत्ता :- ८४१ दुर्गानिवास, बांदा. ता. सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग. ४१६५११.
    सध्या वास्तव्य :- डीएसके विश्व, धायरी, पुणे.
    सहजसंपर्क :- 9021501924
    rajgarde@gmail .com
    धन्यवाद. --- श्री. गुरूराज गर्दे.

    प्रा. गुरूराज ग. गर्दे.
    शैक्षणिक सल्लागार - समुपदेशक, व्याख्याता.

    पत्ता :- डीएसके विश्व, धायरी, पुणे.
    सहजसंपर्क :- 9422058288 / 9422058288
    gururajgarde@gmail.com

    ReplyDelete