आज चा दिवस, २७ फेब्रु., कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्म दिवस. ह्या निमित्ताने त्यांची आठवण.
स्वत:च्या कविते विषयी त्यांची भावना.....
समिधाच सख्या या....
दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवनसरिता,
खळखळे, अडखळे, सुके कधी फेसाळ
परि अखंड शोधे वाट समुद्राकारिता !
खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली !
नव पर्णाच्या या विरल मांडवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
" या जळोत समिधा - भव्य हवी वृक्षाली ! "
समिधाच सख्या या , त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा
जात्याच रुक्ष या , एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा !
खरोखरच ह्या आणि अश्यांसारख्या असंख्य मराठी कविता तुमच्या आमच्या मनामधे क्षणभर तरी हा अग्नी फुलवतील ह्याच या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा !!
स्वत:च्या कविते विषयी त्यांची भावना.....
समिधाच सख्या या....
दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवनसरिता,
खळखळे, अडखळे, सुके कधी फेसाळ
परि अखंड शोधे वाट समुद्राकारिता !
खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली !
नव पर्णाच्या या विरल मांडवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
" या जळोत समिधा - भव्य हवी वृक्षाली ! "
समिधाच सख्या या , त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा
जात्याच रुक्ष या , एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा !
खरोखरच ह्या आणि अश्यांसारख्या असंख्य मराठी कविता तुमच्या आमच्या मनामधे क्षणभर तरी हा अग्नी फुलवतील ह्याच या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा !!