Friday, March 29, 2013

चेहरे


चेहरे लपवणारे, लपणारे असतात. रडलेले, रडवलेलेही बनतात चेहरे
बनतात, बनवतात अन् बरळतातही चेहरे.
चकवतात, चकतात अन् चकाकतातही चेहरे.
बावचळतात, बावरतात अन् गोंधळतातही चेहरे.
उल्हासातून खळाळतात, स्मितातून मुग्ध होतात उत्कटतेच्या भाषेतून पसरतात शब्दांविना.
गूढ काव्याप्रमाणे गूढ प्रदीर्घ होतात तर कधी रोमँटिक काव्याच्या परीसस्पर्शाने हळूवार होतात.
झ-यासारखा अखंड अंतर्नाद ऐकवत रहातात चेहरे.
वेदनेतून व्यग्र होतात, स्तब्ध बनतात निःशब्दासारखे
एकाग्रतेने समाधीस्त वाटतात, चिंतनात खोल खोल दीर्घ बुडतात
चिंताक्रांतही असतात कधीकधी.
चिरंतन सत्याचे अंतिम शत्य उलगडल्यासारखे ‘मोनालिसा’ होतात चेहरे.
                                                           व.पु. (एकूण व.पु)

No comments:

Post a Comment