एक लेखणी काय काय देते....????
यादी करणं मुश्कील आहे
पण,
जिवंतपणीच मुक्ती देते
साथ देते, साथी देते
सोबत देते, सोबती देते
चिंतेतून चिंतन देते
एक लेखणी काय काय देते....
अश्रू पुसण्याची प्रेरणा देते
अश्रू झाकण्याची किमया शिकवते
प्रवास घडवते, प्रवासी जोडते
जगण्याचं गणित सोपं करते
जनावरातला माणूस दाखवते
माणसातलं जनावर प्रकाशात आणते
एक लेखणी काय काय देते....
योजनंच्या योजनं वितळवून टाकते
संवादाचा पूल दशदिशांना जोडते
‘अनोळखी’ हा शब्दच पुसून टाकते
रक्ताचे नाते ठिसूळ करते
शब्दांचेच नाते चिरंतन ठरते
एक लेखणी काय काय देते....
– व.पु.
No comments:
Post a Comment