Friday, March 29, 2013

लेखणी


एक लेखणी काय काय देते....????
यादी करणं मुश्कील आहे
पण,
जिवंतपणीच मुक्ती देते
साथ देते, साथी देते
सोबत देते, सोबती देते
चिंतेतून चिंतन देते
एक लेखणी काय काय देते....
अश्रू पुसण्याची प्रेरणा देते
अश्रू झाकण्याची किमया शिकवते
प्रवास घडवते, प्रवासी जोडते
जगण्याचं गणित सोपं करते
जनावरातला माणूस दाखवते
माणसातलं जनावर प्रकाशात आणते

एक लेखणी काय काय देते....
योजनंच्या योजनं वितळवून टाकते
संवादाचा पूल दशदिशांना जोडते
‘अनोळखी’ हा शब्दच पुसून टाकते
रक्ताचे नाते ठिसूळ करते
शब्दांचेच नाते चिरंतन ठरते
एक लेखणी काय काय देते....                   
                              – व.पु.

चेहरे


चेहरे लपवणारे, लपणारे असतात. रडलेले, रडवलेलेही बनतात चेहरे
बनतात, बनवतात अन् बरळतातही चेहरे.
चकवतात, चकतात अन् चकाकतातही चेहरे.
बावचळतात, बावरतात अन् गोंधळतातही चेहरे.
उल्हासातून खळाळतात, स्मितातून मुग्ध होतात उत्कटतेच्या भाषेतून पसरतात शब्दांविना.
गूढ काव्याप्रमाणे गूढ प्रदीर्घ होतात तर कधी रोमँटिक काव्याच्या परीसस्पर्शाने हळूवार होतात.
झ-यासारखा अखंड अंतर्नाद ऐकवत रहातात चेहरे.
वेदनेतून व्यग्र होतात, स्तब्ध बनतात निःशब्दासारखे
एकाग्रतेने समाधीस्त वाटतात, चिंतनात खोल खोल दीर्घ बुडतात
चिंताक्रांतही असतात कधीकधी.
चिरंतन सत्याचे अंतिम शत्य उलगडल्यासारखे ‘मोनालिसा’ होतात चेहरे.
                                                           व.पु. (एकूण व.पु)

दीपावली
दीपावली........... आसमंत उजळून टाकणा-या प्रकाशाचा क्षण.......!!!!
पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे अंधार दूर करण्याचा सण....!!!
खरतरं, अंधार म्हणजे सूर्याने पाठ फिरवल्यावर मागे पडणारी सावली.... किंवा काळ्या रंगाची अमर्याद पोकळी. आज अवतीभवती दिसणारी बेशिस्त, अस्वच्छता, सुविधांचा अभाव, सर्व क्षेत्रात पसरलेला भ्रष्टाचार बेजबाबदार वागणे, हे सर्व पाहिले की अंधाराची व्याप्ती फार मोठीहोत असल्याचे जाणवते.
यावर उपाय एकच .... स्वतःपुरता एक दीप प्रज्वलित करा. अंधाराचे हे जाळे नक्कीच फिटेल....!!!!

दिव्यामुळे प्रकाश पडतो... प्रकाशामुळे दिवा दिसतो.....
तसाच थोडाफार प्रकार जीवनचिंतनाच्या बाबतीत घडतो....
जीवनामुळे चिंतन संभवते....चिंतनामुळे जीवन कळते....
जीवनात सतत काहीतरी घडत राहते.... माणसाचे मन त्याचा मागोवा घेते....
हळूहळू त्याला कळू लागते...त्या कळण्यामुळे तो मोहरून येतो....
त्याच्या चित्ताला असणा-या चिंतनाच्या तारा नकळत झंकारतात...
त्यातून प्रकट होतो तो त्याचा व्यक्तिगत जीवनवेद....
                                                                                  - शिवाजीराव भोसले (जीवनवेध)